घर फोडून १७ हजारांचा ऐवज लंपास

दरवाज्याचा कडी-कोंडा तोडून घरात प्रवेश करून चोरट्याने १७ हजारांचा ऐवज लंपास केला.

घर फोडून १७ हजारांचा ऐवज लंपास

परभणीः शहरातील साखला प्लॉट परिसरातील एक घर अज्ञात इसमांनी फोडून घरातील सुमारे १७ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. ही घटना २४ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूद्ध शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात जैनदबाबु नसीर अहेमद खान यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. २० ते २४ फेब्रुवारी दरम्यान या चोरट्यांनी दरवाज्याचा कडी-कोंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील वस्तु घेऊन पसार झाले. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. यामध्ये टी.व्ही., शिलाई मशीन, पंखा आणि नगदी रोख रक्कम असा एकूण सुमारे १७ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळवला. याबाबत जैनदबाबु यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल झाला असून घटनेचा पुढील तपास पोलीस नायक लटपटे करत आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.