घर फोडून साडेचार लाख रुपयांचा ऐवज लंपास

४ लाख ४३ हजार ३५० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केले.

घर फोडून साडेचार लाख रुपयांचा ऐवज लंपास

परभणी: शहरातील युसूफ कॉलनी परिसरात घरात कोणी नसल्याची संधी साधुन अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने मिळून ४ लाख ४३ हजार ३५० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवार रोजी उघडकीस आली. याप्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची शाहेद अली याकुब अली खान यांनी तक्रार दिली आहे. ते माजलगाव येथे नौकरीसाठी गेले असता, २१ फेब्रुवारी रोजी त्यांची मुले आणि पत्नी औरंगाबाद येथे नातेवाईकांकडे गेले होते. शनिवारी रोजी ते माजलगाव येथून परभणीच्या घरी परतले असता त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. यावेळी घरातील व कापाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. यामध्ये ८ तोळे २ ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने, ५० तोळ्याची चांदीची चैन असा ४ लाख ४३ हजार ३५० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसून आले. यानंतर त्यांनी नवा मोंढा पोलीस ठाण्यात धाव घेऊन घटनेची तक्रार दिली. यानंतर मोंढा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. याप्रकरणी मोंढा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पो.नि. रामेश्वर तट करत आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.