माकणीत उभारणार मोठे द्रोणागीरी हाॕस्पीटल

माकणी थोर येथे उभारला जाणार एक एकर जागेवर भव्य मोफत दवाखाना देवस्थान कमिटीचा हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला एतहासिक निर्णय.

माकणीत उभारणार मोठे द्रोणागीरी हाॕस्पीटल

निलंगा: सध्या जगभरात कोरोना हा तीन अंकी शब्द मनामध्ये धडकी भरवणारा असून,सर्वत्र कोरोना रुग्णाची बेड मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणत हेळसांड होत आहे.सध्याचं कठीण काळ व येणाऱ्या काळात गावची व बाहेरून येणाऱ्या भाविक भक्तांची वाढती लोकसंख्या, लक्षात घेता प्रसिद्ध तीर्थक्षेत्र महणुण ओळख असलेल्या जाज्वल्य हनुमान देवस्थान समितीच्या वतीने हनुमान जयंतीच्या पूर्व संध्येला एतहासिक निर्णय घेतला असून मंदिर संस्थेच्या स्वतच्या मालकीच्या ठिकाणी एक एकर जागेवर निःशुल्क दवाखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला असून याचे द्रोणगिरी नामकरण करण्यात येणार आहे.

या एतहासिक निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात असून अनेक देवस्थानने असे लोककल्याणकारी निर्णय घेण्याची गरज असल्याचे सांगण्यात येत आहे.माकणी थोर गावची लोकसंख्या तीन हजार असून इथ दर वर्षी बाहेर गावाहून येणाऱ्या भक्तांची १० लाखापेक्षा अधिक नोंद आहे.भविष्यात चिकन गुनिया, कोरोना, व इतर संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी गावातील आरोग्य सेवा अपुऱ्या आहेत.गावात एकही हॉस्पिटल नसून एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे .तिथेही पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत.छोट्या मोठ्या आजारासाठी सुद्धा बाहेर निलंगा किंवा औराद येथे उपचारासाठी जावे लागते.या सर्व बाबी लक्षात घेऊन भविष्यातील गरज समजून देवस्थान समिती ने अभूतपूर्व असा निर्णय सर्व समतीने घेतला आहे.या दवाखान्यात गावातील व बाहेर गावाहून आलेल्या सर्व भाविक भक्तांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत.

या निर्णयाबाबत हनुमान भक्त मा. दिलीपराव देशमूख यांनी सर्व देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांचे असा लोककल्याणकारी निर्णय घेतल्याबद्द दूरध्वनीवरून अभिनंदन केले आहे. गावातील प्रतष्ठित नागरिक विक्रमभाऊ माकणीकर, राहुल माकणीकर , दीपक आकडे, माधव सूर्यवंशी,बजरंग येलीकर ,यांनी लोकप्रतिनिधी मार्फत विशेष मदत या प्रकल्पास मिळवून, साहाय्य करण्याचा माणसं दर्शवल्याचे देवस्थान समितीकडून सांगण्यात आले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.