औरंगाबादमध्ये लसींचा मोठा तुटवडा

दुसऱ्या डोससाठी नागरिकांची भटकंती, पहिला डोस काही दिवस बंद करण्याचा विचार सुरु...

औरंगाबादमध्ये लसींचा मोठा तुटवडा

सुमित दंडुके/औरंगाबाद: शहरात लसींची मागणी प्रचंड वाढली आहे. दुसऱ्या डोससाठी ७० हजारांहून अधिक नागरिक प्रतिक्षेत आहेत. सध्या लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकारने घेतलेली आहे. त्यांच्याकडून लस मिळत नसल्याने हा तुटवडा निर्माण होत आहे. सोमवारी रात्री मनपाला लसींचे ५ हजार डोस मिळाले, ते मंगळवारी अवघ्या दीड ते दोन तासात संपले. त्यामुळे बुधवारी लसीकरण पुर्णपणे बंद राहणार आहे.

लोकसंख्येच्या प्रमाणात लस उपलब्ध करुन दिली जात आहे. शहरात दररोज २० हजार नागरिकांचे लसीकरण ११५ केंद्रांवर होईल, एवढी यंत्रणा मनपाने उभी केली आहे. मात्र, लस तेवढ्या प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने लसीकरणाचा खोळंबा होत आहे. लसींच्या कमतरतेमुळे ११५ पैकी फक्त ३९ केंद्रे सुरु ठेवण्यात येत आहे. त्यातही लस नसल्याने हे लसीकरण आठवड्याचे दोन ते तीन दिवसचं सुरु राहत आहे.

दुसऱ्या डोससाठी नागरिकांची भटकंती
ज्या नागरिकांनी ८४ दिवसांपुर्वी पहिला डोस घेतला होता त्यांना आता दुसरा डोस हवा आहे. लसींच्या तुटवड्यामुळे अनेक नागरिक दुसऱ्या डोसपासून वंचित आहेत. ८४ दिवस पुर्ण होऊनही दुसरा डोस मिळत नसल्याने त्यांची निराशा होत आहे. त्यामुळे काही दिवस फक्त दुसरा डोसच उपलब्ध करुन देण्याचा विचार मनपा करीत आहे, याबाबत लवकरच घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

लसीसाठी पहाटे पाच पासून रांगा
लस लवकर संपून जात असल्याने महापालिकेच्या आरोग्य केंद्रांवर नागरिक पहाटे पाचपासून रांगा लावत आहे. प्रत्येक केंद्राला फक्त १५० लस दिल्या जात आहे. पहिल्या जाणाऱ्या नागरिकांना टोकन देऊन लस दिली जात आहे. हे टोकन मिळवण्यासाठी पहाटे पाच पासून नागरिक लसीकरण केंद्रांवर जाऊन बसत आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.