बिहार निवडणूक मतदानाची शेवटची फेरी सुरू.

1 min read

बिहार निवडणूक मतदानाची शेवटची फेरी सुरू.

तुमच्या मताने राज्याला विकास होईल,नितीशकुमारांचे आवाहन

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिस-या व अंतिम टप्प्याचे मतदान सुरू आहे. शेवटच्या टप्प्यात १५ जिल्ह्यातील ७५ विधानसभा मतदारसंघातील मतदार विधानसभेत आपला प्रतिनिधी निवडण्यासाठी मतदान करीत आहेत.
nitish-1
एकूण ७८ विधानसभा मतदार संघातील १२०४ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. या टप्प्यातील सिमरी बख्तियारपूर आणि मधेपुरा सिट वरही मतदान होत आहे. सिमरी बख्तियारपूर येथील विकसनशील आयएनएस पक्षाचे प्रमुख मुकेश सहनी आणि मधेपुरा येथील जन अधिकार पक्षाचे अध्यक्ष पप्पू यादव हे निवडणूक लढवत आहेत.