लता मंगेशकर यांचे जनतेला आवाहन...

1 min read

लता मंगेशकर यांचे जनतेला आवाहन...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित केल्यानंतर गानकोकीळा लता मंगेशकर यांनी ट्विट करत जनतेला आवाहन केलं आहे.

दिवाळी आणि करोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. शिवाय सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवू नका, असं आवाहन देखील त्यांनी जनतेला केलं. प्रदुषणामुळे कोरोनाचा संसर्ग वाढतोय त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ नको म्हणून काळजी घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित केल्यानंतर गानकोकीळा लता मंगेशकर यांनी ट्विट करत जनतेला आवाहन केलं आहे

'महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित केले. त्याची अंमलबजावणी करणं खूप गरजेचं आहे, असं मला वाटतं. दिवाळीमध्ये कमी कमी फटाके फोडा. प्रदूषण थांबवा. ‘प्रकाशाचं पर्व साजरं करत, दिवाळी साजरी करा.’ असं त्या म्हणाल्या. शिवाय मास्क आवश्य लावा. स्वतःची, कुटुंबाची आणि समाजाची काळजी घ्या,”असं आवाहन लता मंगेशकर यांनी केलं आहे.

कोरोना रुग्णवाढीची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही मोहिम अत्यंत महत्त्वाची ठरली. 'माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमे'मुळे यश लाभले. कोरोना रुग्ण कमी झाले आहेत. त्यामुळे पुढचे ६ महिने नियम पाळा. ६० हजार जणांची टीम 'माझे कुटुंब माझी जबाबदारी'वर काम करत आहे.