किनी यल्लादेवी येथे कै.कौशल्याबाई माधवराव मुळे यांच्या स्मरणार्थ मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीर.

1 min read

किनी यल्लादेवी येथे कै.कौशल्याबाई माधवराव मुळे यांच्या स्मरणार्थ मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीर.

संभाजी ब्रिगेड व उदयगिरी लाॅयन्स नेत्र रूग्णालय यांच्या संयुक्त आयोजित मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीर.

लातूर: किनी यल्लादेवी येथे कै. कौशल्याबाई माधवराव मुळे यांच्या स्मरणार्थ  संभाजी ब्रिगेड व उदयगिरी लाॅयन्स नेत्र रूग्णालय यांच्या संयुक्त आयोजित मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीर नुकतेच झाले. शिबिराचे उदघाटन पत्रकार राम मोतीपवळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मंचावर उपस्थित डाॅ.  रामप्रसाद लखोटीया,  संभाजी ब्रिगेडचे अतुल काकडे, राजकुमार माने, ॲड. प्रमोद बिरादार, प्रा.श्याम डावळे, लक्ष्मीकांत मुळे, ज्ञानेश्वर नारागुडे, आनंद बिरादर, माधव मुंडकर, प्रा.शिवाजी माने, विठ्ठल शेवाळे प्रा. एन. टी. तिरकमटे, गणेश मुंडे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या आयोजकांच्या वतिने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी गावातील १०३  नागरिकांची नेत्र तपासणी करून घेतली. यात मोतीबिंदूचे २३ रूग्ण आढळले असुन त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येतील...