लसीकरणासाठी लातूर जिल्हा प्रशासन सज्ज

लातूर जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी लसीचे २० हजार ९८० डोसेस प्राप्त...

लसीकरणासाठी लातूर जिल्हा प्रशासन सज्ज

लातुर : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार लातूर जिल्हयात कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरणासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. या सज्जतेची पडताळाणी दि.८जानेवारी २०२१ रोजी ड्राय रन प्रात्यक्षिकामार्फत करण्यात आलेली आहे.

कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरणासाठी अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण पुर्ण करण्यात आले असून सदरील प्रशिक्षणात एकुण ४४५ लस टोचक व त्यांना मदत करणारे २०५ तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रावरील वैद्यकीय अधिकारी व जिल्हास्तरीय अधिकारी यांना प्रशिक्षीत करण्यात आले. पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रात कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे, त्यासाठी १७ हजार ८२४ आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांची माहिती Cowin Portal वर अद्ययावत करण्यात आलेली आहे. जिल्हयात एकूण ६८ शितसाठवण केंद्र आहे. परंतु सदरील लसीकरणासाठी दि.१६ जानेवारी २०२१ रोजी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उद्घाटन करण्यासाठी एकुण ८ लसीकरण केंद्राची निवड करण्यात आलेली आहे.

ही ८ केंद्रे असणार आहेत

  1. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर,
  2. एम.आय.टी. वै. महाविद्यालय लातूर,
  3. विवेकानंद हॉस्पीटल लातूर
  4. उपजिल्हा रुग्णालय उदगीर
  5. उपजिल्हा रुग्णालय निलंगा
  6. ग्रामीण रुग्णालय अहमदपूर
  7. ग्रामीण रुग्णालय मुरुड
  8. व ग्रामीण रुग्णालय औसा

या लसीकरण कार्यक्रमासाठी पुणे येथील Serum Institute of India Pune या कंपनीची Covishield या लसीचे २०.९८० डोसेस उपसंचालक कार्यालय लातूर यांच्याकडून प्राप्त झाले असुन जिल्हा परिषदेच्या शितसाखळी कक्षामध्ये +२ ते + ८ डिग्री सेल्सीअस तापमानात साठवण्यात आलेली आहे. दि.१४ जानेवारी २०२१ रोजी उपरोक्त केंद्रावर लस पुरवठा करण्यात येणार आहे.

दि. १६ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ९ पासुन प्रत्यक्ष लसीकरणास सुरुवात होणार असुन सायंकाळी ५ वाजेपर्यंत लसीकरण करण्यात येणार असुन १०० टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्याचे नियेाजन झालेले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे यांनी दिली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.