लातूर मनपाने टेकले हात शहर बंद करा.

1 min read

लातूर मनपाने टेकले हात शहर बंद करा.

राज्याचे वैद्यकिय शिक्षणमंत्री निवडून येत असलेल्या मतदारसंघातील मनपाने हात टेकले

लातूर: राज्याचे वैद्यकिय शिक्षणमंत्री निवडून येत असलेल्या मतदारसंघातील मनपाने हात टेकले असून कोरोनावर नियंत्रण आणायचे असेल तर शहर पूर्ण बंद करा अशी विनंती जिल्हाधिका-याना पाठविलेल्या पत्रात केली आहे.विशेष म्हणजे अमित देशमुख कोरोनायोध्दा बनून राज्यातील कोरोनावर विजय मिळविण्यासाठी लढत असताना मनपाने शहर बंद करणे हीच एकमेव उपाय असल्याचे म्हटले आहे.
लातूर शहरामध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मागील 4 दिवसात शहरातील रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन ही साखळी तोडणे आवश्यक आहे. शहराबाहेरून येणा-या नागरिकांमुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे आढळून आले आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी मनपा सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. कोरोनाची साखळी तोडणे आवश्यक आहे तरी लातूर शहरामध्ये 14 दिवसांसाठी लॉकडाउन करण्याची मागणी महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांना केली आहे.
WhatsApp-Image-2020-07-02-at-1.09.23-PMमनपाच्या पातळीवर उपाय़योजना करत नागरिकांच्या स्वैर वर्तनावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता होती. मात्र तसे न करता. शहर बंद करण्याकडे मनापाचा कल दिसतो आहे. आजुबाजुच्या जिल्ह्यातून स्वॅब तपासणीसाठी देखील लातूरला न पाठवता औरंगाबाद येथे पाठविले जात आहेत. खास करून परळी येथील जे स्वॅब लातूरला पाठविण्यात आले ते निगेटिव्ह येत आहेत. तर औरंगाबाद येथे पाठविलेले स्वॅब मात्र पॉजिटिव्ह येत आहेत. यात कांही गौडबंगाल आहे का अशी शंका परळीकर विचारत असतानाच मनपाची ही मागणी तपासणी निट होत आहे का? शंकेला बळ देणारी आहे.