बलात्कार करून फरार आरोपीस लातूर पोलिसांनी केले अटक

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली फरार आरोपीस अटक करण्याकरिता पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेचे विविध पथके तयार करून फरार आरोपी चा शोध घेतला

बलात्कार करून फरार आरोपीस लातूर पोलिसांनी केले अटक

निलंगाः तालुक्यातील शेडोळ येथील एका सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून फरार झालेल्या आरोपीस लातूर पोलिसांनी अटक केली असून त्याला ताब्यात घेतले आहे.

पोलीस स्टेशन निलंगा येथे गुन्हा रजिस्टर नंबर 92/2021 कलम 376 377,504,506 भादवी, 4,7,8,12 बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम, आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. होता या प्रकरणातील आरोपी अक्रम जिब्राईल पठाण,वय 26 राहणार- शेडोळ हा गुन्हा केल्यानंतर फरार होता.पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली फरार आरोपीस अटक करण्याकरिता पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेचे विविध पथके तयार करून फरार आरोपी चा शोध घेण्यात येत होता.

निलंगा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक फरार आरोपी चा शोध घेत असताना नमूद गुन्ह्यातील आरोपी मौजे एरंडी-सारोळा शिवार, तालुका औसा येथे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने आरोपीस ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी निलंगा पोलीस स्टेशन च्या ताब्यात दिले असून सदर आरोपीस अटक करून मा. न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे,अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव,उपविभागीय पोलिस अधिकारी निलंगा डॉ.अनिल कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे,निलंगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल चोरमले यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अंगद कोतवाड, राजाभाऊ मस्के ,नितीन कटारे ,युसुफ शेख यांनी केली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.