लातूर जिल्हा युवा सेना पुरवणार शेतकऱ्यांना कामगंध सापळे...!

1 min read

लातूर जिल्हा युवा सेना पुरवणार शेतकऱ्यांना कामगंध सापळे...!

लातूर जिल्हा युवा सेनेतर्फे शेतकरी बांधवाना मोफत कामगंध सापळे देण्यात येणार असल्याची माहिती युवा सेनेचे संपर्क प्रमुख प्रा. सुरज दामरे यांनी दिली.

लातूर जिल्हा युवा सेनेतर्फे शेतकरी बांधवाना मोफत कामगंध सापळे देण्यात येणार असल्याची माहिती युवा सेनेचे संपर्क प्रमुख प्रा. सुरज दामरे यांनी दिली.
लातूर जिल्हा परिसरातील दोन हजार शेतकऱ्यांना कामगंध सापळे पुरवण्याचे उद्दीष्ट असून शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी नाव नोंदणी करावयाची आहे. कामगंध सापळयाच्या वापरामुळे किटकनाशकावरचा अवान्तर खर्च निम्म्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. इच्छूक शेतकऱ्यांनी प्रा. सुरज दामरे यांच्या खाड़गाव रोड, लातूर येथील संपर्क कार्यालयात आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन लातूर जिल्हा युवा सेनेच्या वतीने करण्यात आले आहे....!