लातूर येथे एकाच कुटूंबातील कोरोना चे 7 संशयित रूग्ण

1 min read

लातूर येथे एकाच कुटूंबातील कोरोना चे 7 संशयित रूग्ण

प्रतिनिधी : लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकिय विज्ञान संस्थेत आज एकाच कुटूंबातील 7 संशयीत कोरोना व्यक्तींना जिल्हा निगरानी कोरोनी समिती यांच्या मार्फत या संस्थेमध्ये तज्ञ डाँक्टरांच्या तपासणीसाठी आणण्यात आले.
या संस्थेतील तज्ञ डाँक्टरानी या संशयिताचे रूग्णालयापासून विलगीकरण करूण त्यांची तपासणी केली असता यापेकी एकालाही कोरोनाची लक्षणे आढळून आलेली नाहीत. खबरदारीचा उपाय म्हणून संशयित व्यक्तीचे नमुने येथील राष्ट्रीय विज्ञान संस्थेत पाठविण्यात आले आहेत. याचा अहवाल संस्थेस दोन ते तीन दिवसात प्राप्त होईल. तो पर्यत या सर्व संशयितास त्यांच्या राहत्या घरात जिल्हा निगराणी कोरोना समिती यांच्या देखरेखाली विलगीकरनासाठी संस्थेमार्फत हस्तांतरीत केले आहे. सद्यस्थितीत लातूर मध्ये एकही कोरोना रूग्ण आढळून आलेला नाही. असे विलासराव देशमुख शासकिय वैद्यकीय सेस्था अधिष्ठाता मार्फत परिपत्रकाद्वारे कळवण्यात आले.