सिध्देश्वर गिरी/सोनपेठ: कौशल्य विकास व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई व धनश्री मल्टीसर्विसेस पुणे व संकेत मानव विकास संस्थेच्या जयक्रांती प्रशिक्षण केंद्राच्या संयुक्त विद्यमाने, कमवा व शिका योजनेअंतर्गत मोफत हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा या ट्रेनिंग सेंटरचा शुभारंभ नुकताच संपन्न झाला.
परभणी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती दादासाहेब टेंगसे यांच्या हस्ते सदर कोर्सचे उदघाटन करण्यात आले. यावेळी सोनपेठचे माजी नगराध्यक्ष तथा गटनेते चंद्रकांत राठोड,इंजि.सिध्दार्थ गायकवाड,वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे,शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुधीर बिंदु,पत्रकार संघाचे शिवमल्हार वाघे,पत्रकार सिध्देश्वर गिरी,गणेश पाटिल,सुभाष सुरवसे,रामेश्वर पोटे,नगरसेवक विनोद चिमणगुंडे,शरद बनसोडे,संजय उजगरे,कदम,मुख्य व्यस्थापकीय संचालक खदीरबापू विटेकर,संचालक अतुल कोरपे,प्रा.प्रशांत बिराजदार यांच्यासह शिक्षणप्रेमी,पत्रकार,विविध पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोनपेठमध्ये जयक्रांती प्रशिक्षण केंद्राच्या हाँटेल मँनेजमेंट मोफत कोर्सचा शुभारंभ.
परभणी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती दादासाहेब टेंगसे यांच्या हस्ते सदर कोर्सचे उदघाटन करण्यात आले.

Loading...