आहारातून होते ऑक्सिजन पातळी वाढविण्यास मदत, कसं ते जाणून घ्या

हिमोग्लोबिनची पातळी राखण्यासाठी तांबे, लोह, विटामीन-बी चे विविध प्रकार आणि बी-12 या जीवनसत्त्वांची गरज आहे.

आहारातून होते ऑक्सिजन पातळी वाढविण्यास मदत, कसं ते जाणून घ्या

कोरोना काळात आपल्या आरोग्यासाठी विशेष काळजी घेतली पाहिजे. निरोगी शरीर आणि चांगली रोगप्रतिकारक शक्ती कोरोनाला रोखू शकते. यासर्वांमध्ये शरीरातील ऑक्सिजनची पातळी स्थिर राहणे देखील महत्वाचे आहे.या पार्श्वभूमीवर रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी प्रत्येकाने आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढविणे गरजेचे आहे. आहारातून देखिल ऑक्सिजन शक्ती वाढते. लोखंडी कढईत भाज्या करुन खाण्यानेही हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते.

● मानवी शरीरातील रक्तामध्ये असलेल्या लाल पेशीं साठी हिमोग्लोबिन अतिशय महत्त्वाचा घटक असतो हिमोग्लोबिनच्या माध्यमातून शरीरातील विविध अवयवांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. हिमोग्लोबीन हा ऑक्सीजन चा वाहक आहे.

● यामुळे विशेषता आहाराद्वारे ऑक्सिजनची पातळी वाढ होण्यावर भर द्यावा असे आहारतज्ञ सांगतात. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढेल असा पूरक आहार घ्यावा.

● तज्ज्ञांच्या मते पुरुषांसाठी किमान 13.5 ग्रॅम प्रति डेस्सी लिटर आणि महिलांसाठी 12 ग्रॅम प्रति डेस्सीलिटर हिमोग्लोबिन ची गरज असते.

● हिमोग्लोबिनची पातळी राखण्यासाठी तांबे, लोह, विटामीन-बी चे विविध प्रकार आणि बी-12 या जीवनसत्त्वांची गरज आहे.

ऑक्सिजन पातळी वाढवण्यासाठी आहारात या गोष्टींचा समावेश करा

  • बटाटे, तीळ, काजू आणि मशरूममध्ये भरपूर प्रमाणात तांबे (कॉपर) आढळते.

  • चिकन, मटणशिवाय सोयाबीन, हिरव्या पालेभाज्या आणि डाळीमध्ये लोह भरपूर प्रमाणात असते.

  • अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्व अ (व्हिटॅमिन ए) असते. याशिवाय रताळे, गाजर, दुधी, आंबा आणि पालक यामध्येही ते आढळते.

  • ओट्स, दही, अंडी, बदाम, पनीर, ब्रेड आणि दूध यामध्ये राइबोफ्लेविन असते. त्यांचाही आपण आपल्या आहारात समावेश करू शकतो.

  • मांसाहारातून तसंच कडधान्य, सूर्यफूल आणि भोपळ्याच्या भाजलेल्या बिया, भाजलेले शेंगदाणे यातूनदेखील जीवनसत्त्व ब-3 (व्हिटॅमिन बी-3) भरपूर प्रमाणात मिळते.

  • चिकन, ट्यूना मासा, अंडी इत्यादींमधून जीवनसत्त्व ब-5 (व्हिटॅमिन बी-5) मिळू शकते. याशिवाय मशरूम, शेंगदाणे, अॅव्हाकॅडो, ब्रोकोली आणि ब्राऊन राईस यातूनही हे जीवनसत्व मिळते.

  • चिकन, मासे, केळी, पालक इत्यादींमधून जीवनसत्त्व ब-6 (व्हिटॅमिन बी-6) आणि जीवनसत्त्व ब-9 (व्हिटॅमिन बी-6) भरपूर मिळते.

  • लिंबामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळते. त्याचाही आहारात समावेश केला पाहिजे. यामुळे अनेक आजारांना दूर ठेवण्यास मदत मिळेल. तसंच ऑक्सिजनची पातळी वाढण्यासदेखील ते उपयुक्त ठरते.

  • लसूणही आरोग्यासाठी फायदेशीर असून, त्यात अल्कधर्मीय (Alkaline) गुणधर्म असतात. ऑक्सिजन वाढवण्यातही तो उपयुक्त ठरतो.

  • अंकुरीत म्हणजेच मोड आलेली कडधान्ये आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यांच्यामुळे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यासही मदत मिळते. त्यामुळं आहारात मोड आलेले हरभरे, मूग, डाळी आदी पदार्थांचा जरूर समावेश करा.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.