दिवाळीच्या निमित्ताने जाणून कशी बनवतात बेळगावी कडबोळी

1 min read

दिवाळीच्या निमित्ताने जाणून कशी बनवतात बेळगावी कडबोळी

दिवाळी म्हणजे गोड,तिखट आणि काहीसे खुशखुशीत असे फाराळ कराचा सण. दिवाळीत नवनवीन पदार्थ खाण्याची मजाच वेगळी. फराळाशिवाय दिवाळी हे समीकरण जुळतच नाही.

दिवाळी म्हणजे गोड,तिखट आणि काहीसे खुशखुशीत असे फराळ  करायचा सण. दिवाळीत नवनवीन पदार्थ खाण्याची मजाच वेगळी, फराळाशिवाय दिवाळी हे समीकरण जुळतच नाही. मात्र, हल्ली चिवडा, चकली, लाडू, करंजी हे पदार्थ म्हणजे दिवाळीचा फराळ असा एक समज रूढ झालाय. गेल्या काही वर्षांपासून आपण हेच पदार्थ बनवत आणि खात आलो असल्याने तसा समज होणे साहजिक आहे. आता आपण खातो, त्यापेक्षा वेगळे आणि चांगले असे अनेक पदार्थ आपल्या मागच्या पिढ्यांनी बनवले. हे पदार्थ खाणे सोडाच, त्यांची नावे सुद्धा आपण कधी ऐकलेली नाहीत. अशाच काही आपल्याला विसर पडलेल्या पदार्थांची ओळख आणि त्यांच्या रेसिपी आपण या दिवाळीच्या निमित्ताने जाणून घेणार आहोत.

बेळगावी कडबोळी

दक्षिण भारतातून चकली आपल्या स्वयंपाकघरात आणि फराळाच्या ताटात येण्यापूर्वी आपल्याकडं एक मस्त प्रकार अस्तित्वात होता. अजूनही आहे. पण, फार कमी स्वयंपाक घरात बनवला तो म्हणजे 'कडबोळी'. त्यातही विशेष प्रसिद्ध होती म्हणजे 'बेळगावी कडबोळी'. पूर्वी चकलीचा साचा नसल्यानं हातानंच भाजणीच्या पीठाला गोलाकार आकार देऊन कडबोळी तयार केली जातं असे. आधी अठरा धान्यांची कडबोळी बनवत असत. आता मात्र, घरात नेहमीच्या वापरात असलेले धान्यच भाजणीसाठी घेतात. दक्षिण भारतातून चकली महाराष्ट्रात आल्यानंतर चकलीचा साचा आल्यानं कडबोळी विस्मृतीत गेली आहे.

साहित्य - धुतलेल्या तांदळाचे ताजे बारीक दळलेले पीठ सहा वाट्या, एक वाटी लोणी, अर्धा चमचा मिरपूड (हवी असेल तर), कच्चे दूध अर्धा लिटर मळण्यासाठी, तळण्यासाठी तूप, अर्धा चमचा मीठ.

कृती - सहा वाट्या पिठात एक वाटी लोणी, मीठ, मिरपूड घालून कच्च्या दुधात मळून घ्यावे. मनगटाने खूप वेळ (दहा ते पंधरा मिनिटे) पीठ मळणे. पोळपाटावर गोळा घेऊन घोळून कडबोळे तयार करणे. तूप तापत ठेवणे. प्रथम तूप चांगले गरम करणे. पाच मिनिटे मोठ्या आचेवर व नंतर बारीक आचेवर कडबोळे तळून घ्यावेत. एका वेळेच पाच ते सहा कडबोळे तळता येतात. खमंग खरपूस भाजून घ्यावेत.