माझ्या कंपन्या जाऊद्या, 'बहिणींच्या कंपन्यांवर छापे का?'- अजित पवार

आयटीने कुणावर छापेमारी करावी हा त्यांचा अधिकार आहे-अजित पवार

माझ्या कंपन्या जाऊद्या, 'बहिणींच्या कंपन्यांवर छापे का?'- अजित पवार

पुणेः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी आयकर विभागाची कारवाई सुरु आहे. दौंड शुगर ,आंबलिक शुगर , जरंडेश्वर साखर ,पुष्पदंतेश्वर शुगर,नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर कारवाई सुरू असल्याची माहिती आहे. आज सकाळपासून आयकर विभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात येत आहे. यावरच स्पष्टीकरण देताना होय माझ्याशी संबंधित कंपन्यांवर आयटीने धाडी टाकल्या आहेत. आयटीने कुणावर छापेमारी करावी हा त्यांचा अधिकार आहे.शंका-कुशंका आल्यावर छापेमारी करु शकतात. माझ्याशी संबंधित असलेल्या कंपन्यांवर छापेमारी झाली आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

अजित पवार काय म्हणाले?

आयटीनं कुठे छापे टाकावेत हा त्यांचा अधिकार आहे. काही शंका असल्यास ते छापे टाकू शकतात. माझ्याशी संबंधित असलेल्या कंपन्यांवर छापेमारी झाली आहे. मी नियमित टॅक्स भरतो. अर्थमंत्री असल्याने आर्थिक शिस्त कशी राखायची, कुठलाही कर कसा चुकवायचा नाही, टॅक्स कसा भरायचा असतो हे मला चांगले माहिती आहे. माझ्या कंपन्यांचा टॅक्स वेळच्या वेळी भरला जातो. त्यामुळे हे छापे राजकीय हेतूने टाकले की इन्कम टॅक्सलाच खरोखरच काही तपास करायचा होता हे माहीत नाही, असे अजित पवार यांनी सांगितले.

अजित पवार यांच्या बहिणींच्या कार्यालयांवरही छापे टाकण्यात आले आहेत. त्याबद्दल मात्र त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 'माझ्याशी संबंधित कंपन्यांवर छापे टाकल्याबद्दल मला काही म्हणायचे नाही. मी ज्यांची ३५-४० वर्षापूर्वी लग्नं झाली. ज्यांचे संसार चांगल्या पद्धतीने सुरू आहेत, त्या माझ्या तीन बहिणींशी संबंधित कंपन्या आणि कार्यालयावरही छापे टाकण्यात आले आहेत. कोल्हापूरच्या आणि पुण्यात हे छापे टाकण्यात आले आहेत. त्याचे कारण मला माहिती नाही. अजित पवारांचे नातेवाईक म्हणून हे छापे टाकले गेले असतील तर राज्यातील जनतेने याचा जरूर विचार करावा, कोणत्या थराला जाऊन या संस्थांचा वापर केला जातोय हे लक्षात घ्यावे,'असे अजित पवार म्हणाले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.