लेटलतिफांना चाप, पण घरकोंबड्यांच काय? - भारखळकर

कामावर उशिरा येणाऱ्या लेटलतिफांना चाप देण्यासाठी राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली

लेटलतिफांना चाप, पण घरकोंबड्यांच काय? - भारखळकर

स्वप्नील कुमावत/मुंबई : शासकीय कर्मचाऱ्यांना कार्यालयात उशिरा पोहोचल्यावर आता चाप बसणार आहे. कामावर उशिरा येणाऱ्या लेटलतिफांना चाप देण्यासाठी राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. परंतू मंत्रालयात न जाणाऱ्या घरकोंबड्यांसाठी सरकारने काही नियमावली जाहीर केली आहे का ?असा सवाल अतूल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांना कार्यालयात उशिरा पोहोचल्यावर आता चाप बसणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा जीआर जारी केला आहे. पंरतू मंत्रालयात न जाणाऱ्या घरकोंबड्यांसाठी सरकारने काही नियमावली जाहीर केलेली नाही.

नवीन नियमावलीनुसार  महिन्यातून केवळ दोन वेळाच जास्तीत जास्त दीड तास उशिरा येण्याची सवलत असणार आहे. त्यानंतरच्या तिसऱ्या 'लेटमार्क'साठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची रजा वजा करण्यात येणार आहे. ज्या अधिकाऱ्यांना सुट्ट्या कापू नये असे वाटते ते अधिकारी जर दोनपेक्षा अधिक दिवस एक किंवा दीड तास उशिराने ऑफिसात आले तर त्यांना उशिरापर्यंत कार्यालयात काम करावं लागणार आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.