अर्नब यांच्या सुटकेनंतर दिवाळी साजरी करु- राम कदम

1 min read

अर्नब यांच्या सुटकेनंतर दिवाळी साजरी करु- राम कदम

कदम यांच्या निवासस्थान ते प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरापर्यंत पदयात्रा करणार असून अर्णब यांच्या सुटकेसाठी थेट सिद्धिविनायकाकडे राम कदमांचे साकडे

मुंबई: राम कदम हे घाटकोपर येथील त्यांच्या निवासस्थानापासून ते प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरापर्यंत पदयात्रा करणार असून  अर्णब यांच्या सुटकेसाठी थेट सिद्धिविनायकाला साकडे घालणार आहेत. त्यांच्या सुटकेनंतरच दिवाळी साजरी करणार असल्याचे कदम यांनी म्हटले आहे.

अर्णब  यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक झाल्यानंतर त्यांची रवानगी थेट तळोजा कारागृहात करण्यात आली आहे. अर्णव यांना अटक केल्यामुळे भाजपने तीव्र संताप व्यक्त केला असून भाजप नेते आणि कार्यकर्ते या अटकेच्या निषेधार्थ रोज आंदोलन करत आहेत. भाजपचे आमदार राम कदम हे सुद्धा अर्णब यांच्या सुटकेसाठी अनोख्या पद्धतीने आंदोलन करून सरकारचा निषेध नोंदवत आहेत. दोन दिवसांपूर्वी राम कदम यांनी मंत्रालयासमोर उपोषण सुरू केले होते. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर त्यांनी हे आंदोलन मागे घेतले.