लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी जागा देण्याची मागणी

1 min read

लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी जागा देण्याची मागणी

स्मशानभुमीची जागा अपुरी

सिध्देश्वर गिरी/सोनपेठ:सोनपेठ शहरात वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने या समाजात मोडत असणाऱ्या तेली,कोष्टी,जंगम व वाणी समाज बांधवांसाठी उपलब्ध असलेली स्मशानभुमीची जागा अपुरी पडत असल्याने वाढीव जागा देण्याची मागणी नुकतीच सोनपेठचे तहसीलदार आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे.या निवेदनात असे नमुद करण्यात आले आहे की,सोनपेठची एकूण लोकसंख्या लक्षात घेता शहरात २०० ते २५० कुटुंब असून या लोकसंख्येचा विचार करता भविष्यात जागा अपूरी पडत असल्याने वाढीव जागा देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.निवेदनावर तालुकाअध्यक्ष विनोद चिमनगुंडे,संदिप लष्करे,नगरसेवक अमृत स्वामी,प्रा.महालिंग मेहत्रे,नागनाथ कोटुळे,राजेश्वर चौडे संपादक किरण स्वामी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.