आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने संगणकप्रणालीद्वारे महिलांना साक्षरतेचे धडे.

1 min read

आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने संगणकप्रणालीद्वारे महिलांना साक्षरतेचे धडे.

बचत गटातील महिलांकरिता संगणकीय प्रणालीद्वारे व्हिडीओ वेबिनार आयोजित करून, महिलांना आर्थिक साक्षरता होण्याचे धडे.

सिध्देश्वर गिरी/सोनपेठ: परभणी जिल्हा महिला आर्थिक विकास महामंडळ (मविम) अंतर्गत, सर्वोदय लोकसंचलित साधन केंद्र सोनपेठद्वारा तेजस्वीनी आणि दीनदयाळ अंत्योदय राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान मधील बचत गटातील महिलांकरिता संगणकीय प्रणालीद्वारे व्हिडीओ वेबिनार आयोजित करून, महिलांना आर्थिक साक्षरता होण्याचे धडे देण्यात आले.
गटविकास अधिकारी सचिन खुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोनपेठ शहर आणि ग्रामीण भागातील महिलांना सर्वोदय लोकसंचलीत केंद्राच्या माध्यमातून सक्षम केल्या जात आहे. यासाठी केंद्राच्या नसीमा सय्यद, विजयमाला ठेंगे आदींनी परिश्रम घेत आहेत. नुकत्याच संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन सोनपेठ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन खुडे यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शक महिला आर्थिक विकास महामंडळ परभणीच्या निता अंभोरे, महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या सहाय्यक शाखाधिकारी प्राजक्ता गजभिये, एल.आय.सीच्या विकास अधिकारी अरुणा बाजेड, प्रा.सुनीता टेंगसे, सहाय्यक लेखाधिकारी किरण तांदळे यांनी महिलांना मार्गदर्शन केले.
WhatsApp-Image-2020-09-20-at-6.53.05-PM
प्रशिक्षणाचे सूत्रसंचालन नसीमा सय्यद यांनी केले. तर आभार दिलीप जाधव यांनी मानले. महिलांनी बचत कशी करावी, बचतीचे महत्त्व, पोस्ट ऑफिसमधील योजना, मायक्रो इन्शुरन्स, बँक कर्जाचा वापर कसा करावा, दैंनदिन खर्च उत्पन्नाचे लिखाण कसे करावे, आदी बाबींवर सविस्तर मार्गदर्शन या शिबिराच्या माध्यमातून करण्यात आले. प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी सहयोगिनी यांनी परिश्रम घेतले.एकूण १०७ महिलांनी प्रशिक्षणाकरिता उपस्थिती लावली होती.