लक्झरियस सुविधा देणारे विमान

1 min read

लक्झरियस सुविधा देणारे विमान

एका अपार्टमेंटमध्ये असणारया सर्व सुविधांचा समावेश यात करण्यात आला आहे.

प्रत्येक व्यक्तीला वाटत असते की, आपले घर एकदम सुंदर आणि पुर्ण सुविधायुक्त असावे. त्यासाठी प्रत्येक जण प्रयत्नही करत असतो. परंतु नुकतेच एका कंपनीने एक असे विमान बनवले आहे जे एका जहाजासारखे नव्हे तर लग्झरीयस अपार्टमेंट सारखेच दिसत आहे. एका अपार्टमेंटमध्ये असणारया सर्व सुविधांचा समावेश यात करण्यात आला आहे.

इंग्लंडच्या अ‍ॅक्रोपोलिस एव्हिएशन कंपनीच्या विमान कंपनीने हे विमान बाजारात आणले आहे. हे जहाज एअरबस कंपनीचे एसीजे 320 निओ मॉडेल आहे,  याला एका खाजगी विमानाचा लुक देण्यात आला आहे. या खासगी विमानात १७ लोक आरामात झोपू शकता.

या लक्झरी जहाजात एक पेन्टहाउस, बेडरूम, मीटिंग केबिन आणि स्नानगृह आहे. यासाठी एकाच वेळी १९ लोक बसू शकतात. एकदा रिफ्युएलिंग केल्यावर हे जहाज सुमारे ९६०० किमीचा प्रवास पूर्ण करू शकतो.

या खासगी जहाजाची किंमत ८१३ कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने खासगी विमानाचा देखावा देणारी एअरबस यापूर्वी व्यावसायिक जहाज म्हणून वापरली जात होती. लुफ्थांसा आणि ब्रिटीश एअरवेजच्या विमानांमध्ये या मॉडेलचा समावेश आहे. या विमानाच्या अंतर्गत डिझाइनसाठी १३ महिन्यांचा कालावधी लागला. लांब पल्ल्याचा प्रवास करण्यास सक्षम असलेले हे विमान अमेरिकेतून न्यूझीलंड किंवा न्यूयॉर्क ते लंडन हे अंतर एकाच वेळी व्यापू शकतो.

जगातील श्रीमंत लोक डॅसॉल्ट, बॉम्बार्डियर खासगी विमानांना प्राधान्य देतात. परंतु अ‍ॅक्रोपोलिस एव्हिएशन असे म्हणतात की, या जेटमध्ये अधिक लक्झरी वैशिष्ट्ये आहेत आणि ते जागेच्या दृष्टीने प्रत्येक खासगी जेटपेक्षा चांगले आहे.