महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन ?

1 min read

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन ?

दिल्लीमध्ये कोरोनाची तिसरी लाट आल्यानंतर कोरोनाचा संसर्ग आणखी तीव्र वेगाने वाढताना दिसत आहे.

जगभरातील काही देशांसह आपल्या देशाची राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाची तिसरी लाट आल्यानंतर कोरोनाचा संसर्ग आणखी तीव्र वेगाने वाढताना दिसत आहे. त्यामुळे तेथील सरकारने पुन्हा काही निर्बंध लादले असून कोरोनाला आळा घालण्यासाठी आता होम टू होम सर्वेक्षण सुरु केले आहे. यामुळे आपल्या राज्यातील ठाकरे सरकार महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई आणि दिल्ली दरम्यानची विमान आणि रेल्वे सेवा बंद केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेली अनेक दिवस देशात लॉकडाऊन केल्यानंतर आता केंद्र सरकारने लॉकडाऊन एक ते पाचमध्ये हळुहळु काही गोष्टींना परवानगी दिली. सद्यस्थितीला देशभरात लॉकडाऊन पुर्णपणे संपल्यासारखी परिस्थिती आहे. त्यामुळे उद्योग, व्यापार मोठ्या प्रमाणावर रुळावर आले असून दिवाळीनिमित्त मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर दिसले. त्यामुळेच गेल्या काही दिवसापासून दिल्लीत कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झालेली पाहायला मिळाली. त्यामुळे चिंतेत असलेले महाराष्ट्र सरकारने दिल्ली-मुंबई विमान, रेल्वे वाहतुकीवर निर्बंध घातले आहेत. यामुळे महाराष्ट्रत पुन्हा लॉकडाऊन होईल का, हा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.