दिल्लीत पुन्हा लाॅकडाऊनचे सावट

१ आठवडा शाळा बंद, सरकारी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याच्या सूचना

दिल्लीत पुन्हा लाॅकडाऊनचे सावट

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील वायूप्रदूषणाचा धोका पाहता सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारले आहे. त्यानंतर दिल्ली सरकारने अनेक पावले उचलली आहेत. त्यानुसार दिल्ली सोमवारपासून शाळा एका आठवड्यासाठी बंद राहणार आहेत. या काळात ऑनलाईन शिक्षण सुरूच राहणार आहे. तसंच सरकारी कार्यालयं देखील बंद राहणार असून सर्वांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्लीत प्रदूषणामुळे परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की सर्वोच्च न्यायालयाला कडक निर्देश द्यावे लागले. दिल्ली सरकारने तातडीची बैठक बोलावून अनेक मोठे निर्णय घ्यावे लागले.

दिल्लीत पुन्हा लॉकडाऊनसारखी परिस्थिती
दिल्लीत लोकांचा श्वासाचे त्रास वाढले आहेत. दिल्लीत राहायचे असेल तर घरातच थांबा अशी परिस्थिती निर्माण झालीये. प्रदूषणामुळे परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की सर्वोच्च न्यायालयाला कडक निर्देश द्यावे लागले. दिल्ली सरकारने तातडीची बैठक बोलावून अनेक मोठे निर्णय घेतले. सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, लोक घरोघरी मास्क घालून फिरत आहेत. दिल्लीत लॉकडाऊनच्या गरजे असल्याची काळजी न्यायालयाने व्यक्त केली आणि शाळा सुरू करण्यावर नाराजी व्यक्त केली. याचा मुलांवर गंभीर परिणाम होऊ शकतो, खराब हवोमूळे त्यांच्या फुफ्फुसांना इजा होऊ शकते, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.