राज्यात लॉकडाऊन? मुख्यमंत्र्यांचा संध्याकाळी जनतेशी संवाद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी ८:३० वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. आता मुख्यमंत्री राज्यासाठी कठोर निर्बंध लागू करणार की लॉकडॉउन घोषित करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

राज्यात लॉकडाऊन? मुख्यमंत्र्यांचा संध्याकाळी जनतेशी संवाद

मुंबई : राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढणे ही चिंतेची बाब आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लावण्याबरोबर मर्यादित स्वरुपाचा लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. नागरिकांनी कोरोनाच्या प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन केले नाही आणि परिणामी जर कोरोनाचा संसर्ग वाढतच राहिला तर शेवटचा पर्याय म्हणून राज्यात लॉकडाउन लागू करावा लागेल, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. या आठवड्यात राज्य सरकार राज्यात लॉकडाउन लागू करण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. तसे संकेतही मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी ८.३० वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री राज्यासाठी कठोर निर्बंध लागू करणार की लॉकडॉउन घोषित करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जनतेशी संवाद साधण्याआधी आज दुपारी ४:३० वाजता मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठकीचे आयोजन आपल्या वर्षा या निवासस्थानी केले आहे. या बैठकीला राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह इतर मंत्री आणि अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत राज्यभराचा आढावा घेतला जाईल.

राज्यात मिनी लाॅकडाऊन ?
सरकारने काही दिवसांपूर्वी संचारबंदी लावली होती, मात्र कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली नाही. म्हणुन राज्यात मिनी लॉकडाऊन लावण्यात येऊ शकते...
लॉकडाऊन हा अखेरचा पर्याय-राजेश टोपे
लॉकडाऊन ही प्रक्रिया कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महत्त्वाची... लॉकडाऊन हा अखेरचा पर्याय ठेवला आहे. पण परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर ते करावे लागू शकते.

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.