३१ मेपर्यंत राज्यातील लॉकडाऊन वाढणार?

लॉकडाऊन संदर्भात उद्या मंत्रिमंडाची बैठक

३१ मेपर्यंत राज्यातील लॉकडाऊन वाढणार?

मुंबईः कोरोनाचा प्रकोप राज्यात सर्वत्र झाला आहे. कोरोनाची संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लावण्यात आलेले लॉकडाऊन वाढवण्यात येण्याची शक्ता आहे. राज्य सरकारने राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातही कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊनमध्ये ३१ मेपर्यंत वाढ करण्यात येणार असल्याची शक्यता मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी माहिती दिली.

सध्या महाराष्ट्रात जी परिस्थिती आहे त्याबाबत आम्ही आरोग्याच्या पायाभूत सुविधा उभारण्यासंबंधी विचार करतोय. १५ मेनंतर लॉकडाऊन पुढे वाढवायचा असेल तर त्यात कोणते निर्बंध उठवू शकतो व कोणत्या गोष्टींना परवानगी देऊ शकतो व कोणते निर्बंध कठोर करायचे याचा विचार करावा लागेल. बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत विचार केला जाईल, असे अस्लम शेख यांनी म्हटले ल आहे. तसेच, लॉकडाऊनसंदर्भात टास्क फोर्स काय शिफारस करत यावर चर्चा करुनच निर्णय घेतला जाईल,' असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

'लॉकडाऊनमुळं मुंबई आणि महाराष्ट्राचा फायदा झाला आहे. लॉकडाऊनआधी मुंबईची परिस्थिती, रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे. दुसरा लॉकडाऊन करत असताना तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची आपली तयारी सुरु होती. जम्बो सुविधा उभारण्यासाठीकाम सुरु झाली,' अशी माहितीही अस्लम शेख यांनी दिली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.