लॉकडाऊन हा अखेरचा पर्याय-राजेश टोपे

लॉकडाऊन ही प्रक्रिया कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महत्त्वाची... लॉकडाऊन हा अखेरचा पर्याय ठेवला आहे. पण परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर ते करावे लागू शकते.

लॉकडाऊन हा अखेरचा पर्याय-राजेश टोपे

औरंगाबाद : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. पण रुग्णसंख्येचा आलेख वाढतच आहे. त्यानंतर आता पु्न्हा लॉकडाऊन लागू होणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यातच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊनबाबत भाष्य केलं आहे.(Discussions have started that the lockdown will be implemented again. State Health Minister Rajesh Tope has also commented on the lockdown.)

कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढणे ही चिंतेची बाब आहे. त्यानुसार आता लॉकडाऊनच्या चर्चा सुरु आहेत. राजेश टोपे यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, ‘लॉकडाऊनमुळे अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न उद्भवतो, याची जाणीव सरकारला आहे. या सर्वाचा विचार करूनच सर्व निर्णय घेतले जातात. त्यामुळेच लॉकडाऊन हा अखेरचा पर्याय ठेवला आहे. पण परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर ते करावे लागू शकते.

राज्यात मिनी लाॅकडाऊन ?
सरकारने काही दिवसांपूर्वी संचारबंदी लावली होती, मात्र कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली नाही. म्हणुन राज्यात मिनी लॉकडाऊन लावण्यात येऊ शकते...

मात्र, सध्या राज्यात लॉकडाऊन लावण्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. पण लॉकडाऊन लावण्याबाबत चर्चा सुरु आहेत, असेही ते म्हणाले. दरम्यान काही दिवस निर्बंध कडक केले जाणार आहेत. पण लॉकडाऊन लागणारच नाही असे नाही. परिस्थिती पाहून याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. लॉकडाऊन ही प्रक्रिया कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महत्त्वाची असते, असे राजेश टोपे म्हणाले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.