लोणीकरांची बदनामी खोटारडी माध्यमे

1 min read

लोणीकरांची बदनामी खोटारडी माध्यमे

बबनराव लोणीकर यांची बदनामी करणा-या मोठ्या माध्यम समुहातील प्रतिनिधीचे अंकगणित देखील तपासून घेतलेले नसावे. २ कोटी ७९ लाख रूपयांचे २७ कोटी करताना त्या प्रतिनिधीने आपल्या नौकरीशी इमान न राखता आपल्या बोलवित्या धन्याशी निष्ठा राखली असावी

गोबेल्स तंत्र आपण सगळ्यांनी वाचलं आणि अनुभवले असेल. एखाद्या व्यक्तीला अथवा संघटनेला अथवा घटनेला खोटे ठरवायचे असेल तर हे तंत्र वापरले जाते. एक असत्य वारंवार सांगितले की ते अर्धसत्य वाटू लागते.
या तंत्रासाठी एक टोळी तयार होत असते. ही टोळी खोटे मांडते. आणि मग त्या टोळीतील अन्य लोक हेच खोटे खरे आहे असे भासवत ते मांडत राहतात. टोळीतील अनेकांनी मांडले की, मग एवढे लोक बोलतात ते खोटेच असेल का? असा प्रश्न विचारत त्यांचे चेले मांडलेले खोटे खरे असल्याचा भास निर्माण करत राहतात.
जाळ असल्याशिवाय धूर निघत नाही असा तर्क मांडत निघत असलेला धूर हा जाळ लागल्यामुळे असल्याचा आभास निर्माण केला जातो. पण हा धूर नसतो तर धुप असतो. जाळ नसतोच. हे वारंवार सिध्द होत आले आहे.
गल्लीपासून दिल्लीपर्यंत हे घडत आहे. एक घटना आपण तपासून बघू.
जालना जिल्ह्यातील परतूर हे गाव त्यातील लोणी गावचे यादव जे लोणीकर या नावाने ओळखले जातात. त्यातील एक बबनराव लोणीकर (यादव) राज्यात मंत्री राहिले. अनेकवेळा आमदार राहिले. त्यांच्या बदनामीसाठी अनेक प्रयत्न झाले.
बबनराव जरा मोकळा ढाकळा माणुस शिक्षण कमी पण अनुभवाने समृध्द. उरले सुरले अनुभव माध्यमांनी देऊन टाकले. एकापाठोपाठ एक आरोप माध्यमे लोणीकर यांच्यावर लावत आली आहेत. या आरोपामागे कोणी प्रायोजक असल्याचा विश्वास आता दृढ होऊ लागला. कदाचित एखादा घर का भेदीच हे प्रयत्न करत असावा असा समज आता पक्का होऊ लागला आहे.

IMG_20200325_083353

बबनराव लोणीकर यांच्यावर कडे २७ कोटी रूपयांची संपत्ती आहे. आणि खुप मोठ्या गाड्या आहेत. हे लोणीकर विधीमंडळाकडून आमदारांना मिळणारे ३० लाखांचे बिनव्याजी कर्ज घेणार नाही असे सांगत स्वतःला प्रसिध्दीच्या वलयात ठेवत असल्याचा शोध एका मोठ्या दैनिकाच्या वेब पोर्टलने लावला आहे. हा शोध लावताना त्यांनी सोशल मिडियात न झालेल्या पोस्टचा आधार दिला आहे. या आधाराच्या पुष्ट्यर्थ त्यांनी कांही पोस्ट दाखवायला हव्या होत्या पण त्या दाखवल्या नाहीत. असो.. कदाचित त्यांचा सोशल मिडियाचा घरगुती सेल असु शकेल. ही बातमी पोस्ट झाल्यावर त्यावर त्यांना समर्थन करणारी एकही कमेंट ( प्रतिक्रिया) त्यावर दिसली नाही. ज्या दिसल्या त्या केवळ विरोध आणि विरोध करणा-याच. तेही असो.
या माध्यामाच्या ज्या प्रतिनिधीने ही बातमी केली असेल त्याचे अंकगणित जरा कच्चे असण्याची शक्यता आहे. किंवा त्यांच्या अभ्यासक्रमात एकक, दशक, शतक याचा समावेश झालेलाच नसेल. मुळात आता निवडणुक लढविणा-या प्रत्येकाची संपत्ती दडून राहत नाही. ( आता कांही लोकांच्या संपत्ती बेनामी असतील तर भाग वेगळा)
बबनराव लोणीकर आणि त्यांचे पुत्र राहुल लोणीकर या दोघांनी तसेच लोणीकर यांच्या पत्नीने देखील निवडणुक लढवली आहे. या सगळ्या निवडणुकात त्यांनी शपथपत्र दिले आहे. आपली संपत्ती जाहिर केली आहे.
२०१९ ची निवडणुक लढवताना बबनराव लोणीकर यांनी आपली मालमत्ता जाहिर केली आहे.

IMG-20200322-WA0007

बबनराव लोणीकर यांचा पॅन क्रमांक उघड आहे. त्यांच्या दोन पत्नी आणि दोन मुले अशी त्यांच्यावर अवलंबून आहेत. पाच जणांची एकत्र स्थावर मालमत्ता मिळून दोन कोटी एकोणऐंशी लाख इतकी आहे. याच २,७९,००००० या आकड्याला या वेबपोर्टलच्या प्रतिनिधीने २७ कोटी करून टाकले. म्हणजे चक्क दहा पट वाढ लोणीकर यांच्या संपत्तीमध्ये करून टाकली आहे.
आता दुसरा दावा केला जाईल म्हणून एक गोष्ट नोंद करण्यात यावी बबनराव लोणीकर यांचे चिरंजीव राहुल लोणीकर यांचा स्वतंत्र पॅन कार्ड आणि स्वतंत्र अवलंबून असलेले कुटूंब आहे. यांची मालमत्ता अधिक असेल असा प्रश्न निर्माण केला जाईल म्हणून स्पष्ट करावे लागेल की राहुल लोणीकर यांनी देखील निवडणुक लढवली आहे. त्यांनी देखील आपली मालमत्ता जाहिर केली आहे. ती एकुण मालमत्ता बबनराव लोणीकर यांच्यापेक्षा अधिक नाही. आपल्या मंत्रीपदाच्या पाच वर्षाच्या काळात लोणीकर यांनी मालमत्तेची मोठी खरेदी देखील केलेली नाही,
केवळ राहुल लोणीकर यांनी जालन्यात मंगल कार्यालय उभा करण्यासाठी भुखंड खरेदी अलिकडच्या काळात केली आहे. ती जालन्यातील खासगी मालमत्ता आहे.
बबनराव लोणीकर यांचा दुसरा मुलगा श्रीजय आणि मुलगी भक्ती यांच्या नावावर शुन्य मालमत्ता आहे. लोणीकर यांनी आपले उत्पन्न ४१ लाख रूपये इतके घोषीत केले आहे.
असे असतानाही लोणीकर यांची मालमत्ता २७ कोटी रूपयांची असल्याचा जावाई शोध लावत कर्ज नाकारणे म्हणजे स्टंटबाजी असा आरोप करत लोणीकर यांची प्रतिमा मलीन करण्याचा हा प्रयत्न केला आहे.
लोणीकर यांच्यावर झालेली ही कांही पहिलीच चिखलफेक नाही. या आधी पैसे दिले या शब्दाचा अर्थ हवा तसा काढत निधी वाटपाला निवडणुकीतील पैसे वाटप असे म्हटले गेले.
अशी अनेक उदाहरणे देता येतील ज्यात लोणीकरांच्या चरित्रहननाचा प्रयत्न केला आहे. याचा आढावा या आधीच्या व्हिडीओ ब्लॉग मध्ये घेतला आहेच.