शहरात 'पेट्रोलवॉर' बघा काय आहेत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पेट्रोल भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा, अनेक ठिकाणी वाद...

शहरात 'पेट्रोलवॉर' बघा काय आहेत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सुमित दंडुके/औरंगाबाद : शहरात प्रत्येक शनिवार-रविवार कडक लॉकडाउन पाळण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांचे असतानाही अनेक लोक विनाकारण फिरताना दिसत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी शनिवार-रविवार कडक लॉकडाउनच्या दिवशी केवळ अत्यावश्यक सेवांनाच पेट्रोल देण्यात यावे असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांतर्फे देण्यात आले आहेे. त्यामुळे आज सकाळपासुनच शहरातील सर्वच पेट्रोल पंपवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. पेट्रोल पंपवरील कर्मचारी केवळ अत्यावश्यक सुविधा असणाऱ्या वाहनांनाच पेट्रोल देत असल्याने इतर वाहनचालक त्यांच्याशी हुज्जत घालत आहे. त्यामुळे अनेक पेट्रोल पंपावर पोलीस बंदोबस्तात पेट्रोल देण्यात येत आहे.

काय आहे आदेश
सर्व नागरिक व वाहन धारक यांना कळविण्यात येते की, कोरोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता औरंगाबाद येथील जिल्हा अधिकारी यांनी जिल्ह्यातील पेट्रोल पंप यांच्या वेळेत काही बदल केला आहे. त्यामुळे आज दिनांक २७ व २८ मार्च म्हणजे शनिवार व रविवार रोजी फक्त अत्यावश्यक सेवा, आरोग्य ॲम्बुलन्स सेवा, पोलीस प्रशासन, शेती माल वाहतूक सेवा यांनाच पेट्रोल व डिझेल मिळणार आहे. तसेच सोमवार म्हणजे २९ मार्च पासून ते ४ एप्रिल पर्यंत रात्री ८ वाजेपासून ते सकाळी ५ वाजेपर्यंत पेट्रोलपंप बंद राहील तर सकाळी ५ वाजेपासून ते रात्री ८ वाजेपर्यंत ग्राहकांच्या सेवेसाठी चालु राहील. तर या बंद काळात या परिसरातील काही पेट्रोलपंपवर पेट्रोल व डिझेल यांची छुप्या मार्गाने विक्री करत असेल तर त्यांच्यावर कडक व कठोर कारवाई करण्यात येईल असे कडक आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत...


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.