'लव्ह औरंगाबाद मोहिमेला सुरुवात'

1 min read

'लव्ह औरंगाबाद मोहिमेला सुरुवात'

स्वच्छतेचे शहर म्हणून आपल्या शहराची छबी निर्माण करण्यासाठी मनपाने १ नोव्हेंबर ते दिवाळीपर्यंत ‘स्वच्छता मोहिम’ हाती घेतली आहे.

सुमित दंडुके / औरंगाबाद : स्वच्छतेचे शहर म्हणून आपल्या शहराची छबी निर्माण करण्यासाठी मनपाने १ नोव्हेंबर ते दिवाळीपर्यंत ‘स्वच्छता मोहिम’ हाती घेतली आहे. 'लव्ह औरंगाबाद' या मोहिमेअंतर्गत शहरातील कानाकोपऱ्यात साफसफाई करण्याचे नियोजन केले आहे. प्रत्येक रविवारी आपल्या परिसरातील, वॉर्डातील, वसाहतीत स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. यासाठी प्रत्येक प्रभागाचे झोन अधिकारी हे मुख्य समन्वयक असणार आहेत. ‘लव्ह औरंगाबाद’ मोहिमेचा एक भाग म्हणून फुटपाथ सुधारणे, सायकल ट्रॅक तयार करणे, हरित पट्टा वाढविणे, ऐतिहासिक दरवाजांचे जतन करणे, खाम नदी साफसफाई करणे आदी काम हाती घेण्यात आले आहे.
WhatsApp-Image-2020-10-29-at-9.30.51-PM
तीन कामांच्या नागरीकांकडून अपेक्षा :

नागरिकांचे शहरावर खरेच प्रेम असेल, शहर म्हणजे आपले परिवार असे सर्वजण मानत असाल तर नागरिकांकडून आयुक्तांनी तीन कामांची अपेक्षा ठेवली आहे. यात

१) शहरातील विविध भागांमध्ये उद्भवणाऱ्या नागरी समस्यांकडे नागरिकांनी लक्ष वेधायला हवे.

२) शहरातील ऐतिहासिक वास्तु, वस्तुंचे संरक्षण प्रत्येकांने करायला हवे. जे चांगले काम होत आहे, त्याचे कौतुक करायला हवे.

३) शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन सहभाग नोंदवायला हवा, अशी अपेक्षा नागरिकांकडून ठेवली आहे.

स्वच्छतेबाबत बदल करण्याचे आवाहन :

नागरीकांनी स्वतःही एक जबाबदार व्यक्ती म्हणून स्वतामध्येही बदल घडवून आणण्याची अपेक्षा आयुक्तांनी पत्राद्वारे ठेवली आहे.

१) आपल्या घरात निघणारा कचऱ्याचे तीन भागांमध्ये वर्गीकरण करावे.

२) घरातील कचरा घंटागाडीतच टाकावे अथवा स्वच्छता कर्मचाऱ्यांकडे सुर्पूद करावा. कचरा रस्त्याच्या कडेवर, उघड्या जागेवर किंवा नाल्यात टाकू नये. कचरा जाळून टाकण्याचा प्रयत्नही करू नये.

३) आपल्या घरासमोर कचरा संकलन करण्यासाठी येणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांशी आदराने वागावे असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.