लोअर दुधना चे पाणी लवकरच नदीपात्रातून सोडणार-आ.पाटील

आ.डॉ.राहुल पाटील यांची जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे मागणी

लोअर दुधना चे पाणी लवकरच नदीपात्रातून सोडणार-आ.पाटील

परभणी/प्रतिनिधी: उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे परभणी मतदार संघातील असंख्य गावाचे नदीपात्र कोरडे पडले आहेत. त्यामुळे पाण्याअभावी संबंधित गावाच्या पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. पिण्याच्या पाण्याअभावी नागरिकांचे व जनावराचे अतोनात हाल होत आहेत. सध्यस्थितीत लोअर दुधना प्रकल्पात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे लोअर दुधनाचे पाणी परभणी मतदार संघातील गावांच्या नदीपात्रातून सोडण्यात यावे अशी मागणी आ.डॉ.राहुल पाटील यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.

गुरुवार दि. 7 एप्रिल रोजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची आ.राहुल पाटील यांनी प्रत्यक्ष भेट घेतली. लोअर दुधना प्रकल्पात सध्या मुबलक पाणीसाठा असल्यामुळे नदीपात्रातून पाणी सोडण्यासाठीचे तात्काळ आदेश देण्यात यावेत, अशी मागणी एका निवेदनाद्वारे आमदार पाटील यांनी केली आहे. यावर जलसंपदा मंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेऊन लवकरच नदीपात्रातून पाणी सोडण्यात येईल असे सांगितले. यावेळी आ. डॉ. राहुल पाटील यांच्यासमवेत धर्मापुरी, बोबडे टाकळी, कुंभकर्ण टाकळी, वाडी दमाई, साडेगाव, संबरा, देवठाणा, साबा, मुरुंबा, सांवंगी, झरी, जोडपरळी येथील सरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.