LPG सिलेंडर पुन्हा महागला

डिझेलच्या वाढत्या किंमतींबरोबरच घरगुती गॅसच्या दरातही वाढ होत असल्याने सामान्यांमध्ये संतापाची लाट आहे.

LPG सिलेंडर पुन्हा महागला

नवी दिल्ली : दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे सामान्य माणसांच्या खिशाला कात्री लागत आहे. कोरोनाने अगोदरच सगळी आर्थिक घडी मोडकळीस आलेली असताना महागाई सर्वसामान्यांचे जगणे कठीण करत आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. विना अनुदानीत एलपीजी सिलिंडरच्या दरात २५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर हे नवे दर सोमवार रात्रीपासून लागू होणार आहेत. वाढलेल्या किमतींमुळे देशाची राजधानी दिल्लीमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरचे दर आता ८५९.५० रुपयांवर पोहोचले आहेत. या अगोदर १ जुलैला सिलेंडरच्या दरात २५.५० रुपयांनी वाढ झाली होती.

घरगुती गॅससोबतच १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरचे दरही ६८ रुपयांनी वाढलेत. यापुर्वी १ जुलैला तेल कंपन्यांनी गॅसचे दर २५ रुपयांनी वाढवले होते. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतींबरोबरच घरगुती गॅसच्या दरातही वाढ होत असल्याने सामान्यांमध्ये संतापाची लाट आहे.

आतापर्यंत घरगुती सिलेंडरच्या किंमतीत १६५ रुपयांची वाढ
जून महिन्यात दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडरची किंमत किंमत ८०९ रुपये होती. त्यानंतर १ जुलैला सिलेंडरचे दरात वाढ होत किंमत ८३४ रुपये झाली. दरम्यान १ जानेवारीपासून आजपर्यंतच्या दर बघितले तर गेल्या आठ महिन्यात सिलेंडरच्या किंमतीत १६५ रुपयांची वाढ झाली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.