मार्चमध्येच औसा तालुक्यात तीव्र पाणी टंचाई

1 min read

मार्चमध्येच औसा तालुक्यात तीव्र पाणी टंचाई

घागरभर पाण्यासाठी नागरिकांची भटकंती

दोनदोन महिने नळाला पाणी येत नाही. अधिग्रहण व पाणी पुरवठ्याची यंत्रणा कार्यान्वित करण्यात गावपुढारी सरसावत नाहीत. तांड्यासह तालुक्यातील अनेक गावात घागरभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मार्च महिना चालू होताच तालुक्यातील ग्रामीण भागात तीव्र पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. दुसरीकडे परभणी जिल्ह्यात 33 मी.मी अवकाळी पाऊस पाडत आहे.

फोटो-गुगल साभार

औसा तालुक्यात सक्षम पाणी पुरवठा योजना असताना देखील नागरिकांना दोनदोन महिने पाणी पुरवठा होत नाही. नियोजन नसल्याने प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना दुष्काळ सहन करावा लागत आहे. औसा तालुक्यातील गुळखेडा, रिंगणी, सिरसल, कोरंगळा, वानवडा, जमालपुर यासह तालुक्यातील बहुतांश गावाल पाणी टंचाई निर्माण झाली. तालुक्यात सर्वधिक मोठी ग्रामपंचायत किल्लारीत दिवाळीपासून टंचाई आहे.

 -स्वप्नील कुमावत