मुंबई :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बांद्रा भागातील मातोश्री निवासस्थानाबाहेरून एका दरोडेखरोला अटक करण्यात आली आहे. या दरोडेखोराकडून जिवंत काडतुसासह पिस्तुल देखील जप्त करण्यात आले आहे.
इर्शाद खान असं या दरोडेखोराचं नाव आहे. इर्षाद खानवर अनेक ठिकाणी दरोडे टाकल्याचे गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती आहे. मातोश्रीच्या शंभर मीटर परिसरातून आरोपी इर्शाद खानला अटक करण्यात आली आहे. इर्षाद खान मातोश्रीच्या अगदी जवळ काय करत होता. त्याचा हेतू काय याचा तपास आता मुंबई पोलीस घेत आहेत. मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानाजवळच अशा स्वरूपाचा व्यक्ती सापडल्याने मुंबई पोलीस सतर्क झाली आहे.
या आधी देखील मातोश्रीजवळ एका शोतकर-याला धक्काबुक्की झाली होती.
मातोश्री बाहेर दरोडेखोर, पिस्तुलासाह अटक

Loading...