गुटखा तस्करीचे थेट मध्यप्रदेश कनेक्शन

6 आरोपींवर गुन्हा दाखल...

गुटखा तस्करीचे थेट मध्यप्रदेश कनेक्शन

विजय कुलकर्णी/ परभणी : शहरातील जुना मोंढा भागात असलेल्या भाजीमार्केट पसिरात पकडलेल्या ३९ लाख ६५ हजार ५०० रूपयांच्या अवैद्य गुटखा प्रकरणी मध्यप्रदेशातील चार आरोपींसह अन्य दोन अनोळखी इसमांवर नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने केली आहे.

दरम्यान या प्रकरणी स्था.गु.शा.चे कर्मचारी बालासाहेब तुपसमिंद्रे यांनी फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीत शहरातील जुना मोंढा भागात असलेल्या भाजीमार्केट मध्ये दि.३ रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास स्था.गु.शा.च्या कर्मचा-यांनी कारवाई करत गुटख्याचा ट्रक ताब्यात घेतला. या ट्रकमध्ये लाखो रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करीत साहित्य नानलपेठ पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत आर.एम.डी.,सुगंधीत तंबाखु, रजनीगंधा, मिराज या सारख्या प्रतिबंधीत केलेला गुटखा ज्याची किंमत ३९ लाख ६५ हजार ५०० रूपये एवढी आहे. यासह १२ लाख किमतीचे वाहन ताब्यात घेतले आहे. हा माल मध्यप्रदेशातून नांदेडकडे जात होता. आरोपींमध्ये नरेंद्र मंडलोही, शब्बीर पठाण जुम्मा पठाण, कपील हिरालाल चौहान, शेख चॉंद शेख शेहजाद हे सर्व आरोपी मध्यप्रदेशातील असून परभणी येथे अन्य दोन अनोळखी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरिक्षक मोरोती चव्हाण करीत आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.