मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान कोरोना पॉझिटिव्ह.

1 min read

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान कोरोना पॉझिटिव्ह.

त्यांनी स्वत: याबद्दल माहिती दिली

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी स्वत: याबद्दल ट्विटरवर माहिती दिली आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले, माझ्या प्रिय लोकांनो, मला कोविड -19 ची लक्षणे जाणवत होती, मी कोरोनाची चाचणी केली असता माझा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मी माझ्या सर्व सहका-यांना आवाहन करतो की जो कोणी माझ्या संपर्कात आला आहेत त्यांनी त्यांची कोरोना टेस्ट करुन घ्यावी. माझ्या जवळच्या लोकांनी क्वारंटाईन व्हावे.