महाजॉब्स पोर्टलचा शुभारंभ, कंपन्या मात्र लॉकडाऊन

1 min read

महाजॉब्स पोर्टलचा शुभारंभ, कंपन्या मात्र लॉकडाऊन

मुंबईः राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी निर्माण करून देणाऱ्या ‘महाजॉब्स’ या वेबपोर्टलचे दि. ६ जुलै दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. तर राज्यातील औद्यगिक क्षेत्रामध्ये 100 दिवसाच्या लॉकडाऊन नंतर पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्यात येत आहे. काही ठिकाणी लॉकडाऊन झाला आहे. तर काही ठिकाणी लॉकडाऊन घोषित करण्याची तयारी सुरु आहे. साध्या महाजॉब्स पोर्टलचा शुभारंभ आणि कंपन्या मात्र लॉकडाऊन अशी स्थिती आहे.

टाळेबंदीमुळे अनेक उद्योग बंद पडत आहेत. तर देश आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने पाऊल टाकत असताना यातच महाराष्ट्रामध्ये जगभरातील विविध देशांमधील 14 हून अधिक गुंतवणुकदारासोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. तर राज्यात मॅग्रेटिक महाराष्ट्र 2.0 मध्ये 25 हजार कोटींपेक्षा आधिकची गुंतवणूक करण्यात आली आहे. यात 3 चिनी कंपन्याची गुतंवणुक देखील आहे. देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र सरकार देशातील उद्योजकांना उद्योग करण्यासाठी उभारी देत आहेत तर राज्यात मात्र विदेशी गुंतवणुक आणली जात आहे.

टाळेबंदीनंतर राज्यात सध्या ६५ हजार उद्योग सुरू झाले आहेत. तर अनेक नवे उद्योग येऊ घातले आहेत. नुकतेच राज्य शासनाने देश-विदेशातील विविध कंपन्यांसोबत सुमारे 17 हजार कोटींचे सामंजस्य करार केले आहेत. याखेरीज नवीन उद्योग सुरू करण्यासाठी परवानागी दिली आहे. अशा स्थितीत उद्योगात कुशल, अर्धकुशल तसेच अ-कुशल कामगारांची मागणी वाढली आहे. मध्यंतरी कोरोना संसर्गामुळे कामगारांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे. हे कामगार परत कधी येतील, याची निश्चिती नाही, त्यामुळे उद्योगांना कामगाराचा तुटवडा भासू नये, तसेच स्थानिकांना रोजगार मिळावा. यासाठी ‘महाजॉब्स’ हे वेबपोर्टल तयार करण्यात आले आहे. पण पुन्हा लॉकडाऊन यामुळे बेरोजगार वाढण्याची शक्यता आहे.

रोजगाराच्या शोधात असलेल्या इच्छुकांनी आपली माहिती महाजॉब्स पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे. एकदा नोंदणी केल्यानंतर विविध कंपन्यांकडून इच्छुकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. राज्यातील औद्योगिक क्षेत्रामध्ये पुन्हा लॉकडाऊन लावण्याची तयारी सुरु आहे. उद्योगात लॉकडाऊन करु नका. अशी मागणी करत आहेत. आता सरकार महाजॉब्स पोर्टल मधून बंद कंपन्याना कामगार पुरवणार का ? असे प्रश्न बेरोजगाऱ्यांना पडला आहे.