महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोरोना पॉझिटिव्ह.

1 min read

महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोरोना पॉझिटिव्ह.

महाराष्ट्राचे मुख्य सचिव संजय कुमार यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

मुंबई: महाराष्ट्राचे मुख्य सचिव संजय कुमार यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत असल्याने त्यांनी कोविड चाचणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं असल्याने ते होम क्वारंटाइन आहेत. राज्याचे मुख्य सचिव म्हणून ते अनेक बैठकांना हजर असतात. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्यांची चिंता वाढली आहे. कोरोनाचा राज्याच्या मंत्रिमंडळातही वेगाने शिरकाव होत आहे.