Maharashtra Corana Update: राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाखांच्या वर

1 min read

Maharashtra Corana Update: राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाखांच्या वर

49 हजार 616 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु

मुंबई:राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आज 1 लाखांच्या वर गेला आहे. आता पर्यंत 47 हजार 796 रुग्ण उपचार घेवुन बरे झाले आहेत. तर 49 हजार 616 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत राज्यात 6 लाख कोरोना चाचण्या झाल्या आहेत, त्यातील 16.18 टक्के चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. राज्याचा रिकव्हरी दर 47.3% इतका आहे.
राज्यात सध्या 53 शासकीय आणि 42 खाजगी अशा एकूण 95 प्रयोगशाळा कोविड-19 च्या चाचण्या करत आहेत. 12 जूनपर्यंत आलेल्या 6 लाख 24 हजार 977 नमुन्यांपैकी 1 लाख 1 हजार 141 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.