
स्वप्नील कुमावत/मुंबई : महाराष्ट्रात आज 2553 नविन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यासह राज्यातील कोरोना रुग्णांचा एकूण आकडा 88 हजार 528 वर पोहोचला आहे. यापैकी एकूण 40 हजार 975 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात 44 हजार 374 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोविड 19 मुळे राज्यात आतापर्यंत 3 हजार 169 कोरोनाग्रस्तांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यूदर 3.57 टक्के इतका आहे अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या 5 लाख 64 हजार 31 नमुन्यांपैकी 88 हजार 258 नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील 5 लाख 648 हजार 736 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये 75 हजार 759 खाटा उपलब्ध आहेत. यात सध्या 26 हजार 760 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.