' महाराष्ट्र शोकमग्न आहे'- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर

' महाराष्ट्र शोकमग्न आहे'- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबईः नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली. या ऑक्सिजन गळतीच्या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत प्राण गमावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. तसंच, या घटनेचे उच्चस्तरीय आदेश ही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

नाशिकमध्ये रुग्णालयातील ऑक्सिजनच्या टँकमध्ये गळती, २२ रुग्णांचा मृत्यू
हा मिनिटांच्या ऑक्सिजनसाठी किती जीव गेले. या निर्दयी प्रशासनाला आणि व्यवस्थेला जाग केव्हा येणार?

मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर

या संपूर्ण घटनेत उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मी दिले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचे देखील त्यांनी जाहीर केले आहे. नाशिकची ही घटना सर्वांसाठी केवळ धक्कादायक नाही तर प्रशासनाला या संपूर्ण लढ्यात आपल्याला अतिशय काळजी घेऊन जावे लागणार आहे हे शिकविणारी आहे. आज गेल्या वर्षभरापासून आपण कोविडच्या लाटेला सामोरे जात आहोत. उपलब्ध डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी हे रात्रंदिवस रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी झटताहेत, अशा परिस्थितीत अशा निष्काळजीपणाने जीव जाणे मनाला अतिशय बोचणारे आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की , केवळ शोक सांत्वना करून चालणार नाही. अशा घटना भविष्यात घडू नये आरोग्य यंत्रणांचे मनोबल ज्यामुळे खच्ची होईल अशी कोणतीही घटना घडू नये यासाठी प्रशासनाने अतिशय काळजीपूर्वक आणि डोळ्यात तेल घालून काम केले पाहिजे.

महापालिकेकडून ५ लाखांची मदत

मृतांच्या नातेवाईकांना महापालिका प्रशासनाकडून ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर, सरकारकडून ५ लाखांची मदत मिळणार असून मृतांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत मिळणार आहे, अशी माहिती नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.