कोरोना लसीकरणात महाराष्ट्राची घोडदौड सुरुच

लसींच्या दोन्ही मात्रा देण्यात देशात महाराष्ट्र प्रथम

कोरोना लसीकरणात महाराष्ट्राची घोडदौड सुरुच

मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत १२ लाख नागरिकांना लसीकरण करुन महाराष्ट्राने नवा विक्रम केला आहे. काल राज्यात १२ लाख ६ हजार ३२७ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. राज्यात लसीकरण मोहिमेत आतापर्यत दिलेल्या एकुण डोसची संख्या ६ कोटी २७ लाखांवर गेली आहे. देशभरात उत्तरप्रदेश पाठोपाठ महाराष्ट्रने ही विक्रमी कामगिरी केली आहे.

राज्यात २१ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी ११ लाख ४ हजार ४६४ नागारिकांना लस देऊन महाराष्ट्राने आतापर्यतची सर्वाधिक संख्या नोंदविली होती. मात्र काल झालेल्या लसीकरण सत्रांमध्ये ११ लाख ९१ हजार ९२१ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. काल रात्री उशिरापर्यंत या आकडेवारीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. लसीकरण कार्यक्रमातील हा आजपर्यंतचा विक्रम असून आरोग्य यंत्रणेतील सर्व घटकांच्या परिश्रमाचे हे फलित आहे, असे सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी सांगितले.

लसींच्या दोन्ही मात्रा देण्यात देशात महाराष्ट्र प्रथम
महाराष्ट्रात आजपर्यंत एकूण ६ कोटी १५ लाख १६ हजार १३७ लसींच्या मात्र देण्यात आल्या असून त्यात दुसऱ्या लसीची मात्रा देण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे.कोविड प्रतिबंधक लसीकरणाच्या आज जारी केलेल्या एकत्रित अहवालानुसार महाराष्ट्रात १ कोटी ७१ लाख जणांना दुसऱ्या लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.