महात्मा फुले कर्जमाफी योजनेतील विसंगता मिटवा.

1 min read

महात्मा फुले कर्जमाफी योजनेतील विसंगता मिटवा.

ही कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप काही कर्जमाफी विना वंचित असलेले शेतकरी करत आहेत. सदर विसंगता मिटवण्याची मागणी एका निवेदनाद्वारे राज्याचे अर्थमंत्री व महात्मा फुले कर्जमाफी योजनेचे प्रमुख अजित पवार यांच्याकडे सोनपेठ युवासेनेचे तालुकाप्रमुख रामेश्वर मोकाशे यांनी केली आहे.

सिध्देश्वर गिरी/परभणी: महात्मा फुले कर्जमाफी योजनेची घोषणा होऊन 8 महिने झाले. तरीही या योजनेची व्याप्ती ग्रामीण भागापर्यंत पोहचलेली नाही. सरसगट 2 लाख रुपयांची कर्जमाफी ही घोषणा ग्रामीण भागातील गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहचलीच नाही. ही कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप काही कर्जमाफी विना वंचित असलेले शेतकरी करत आहेत.
त्यामुळे महात्मा फुले कर्जमाफी योजनेत मोठ्या प्रमाणात विसंगता निर्माण झाली असून. सदर विसंगता मिटवण्याची मागणी एका निवेदनाद्वारे राज्याचे अर्थमंत्री व महात्मा फुले कर्जमाफी योजनेचे प्रमुख अजित पवार यांच्याकडे सोनपेठ युवासेनेचे तालुकाप्रमुख रामेश्वर मोकाशे यांनी केली आहे.

सोनपेठ युवासेना तालुकाप्रमुख रामेश्वर मोकाशे

निवेदनात असे नमूद केले आहे, महात्मा फुले कर्जमाफी योजनेत जुने शेतकरी पात्र असतांना, त्या शेतकऱ्यांची कर्जमाफीची रक्कम संबधित विभागाकडून शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर वर्ग झाली नसल्याने. त्यांना नवीन पिककर्ज मिळत नाही, पेरणी करुन 3 ते 4 महिन्यांचा हंगाम उलटला आता रब्बी हंगाम आला. तरीही खरीप पिक कर्जच बँकेकडून दिल्या जात नाही. केवळ पात्रतेमधील निकष लावून राष्ट्रीयकृत बँकेकडुन शेतकऱ्यांना वेठीस धरण्यात येत आहे.
एकीकडे दुबार-तिबार पेरणीचे संकट ओढवले तर दुसरीकडे शेतकऱ्यांना कर्जच मिळत नाही. ही बाब गंभीर असून शासनाने प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांना याबाबत कडक निर्देश देऊन. शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट दूर करण्यासाठी नव्याने पाऊल उचलावे, अन्यथा ग्रामीण भागात आत्महत्या वाढून मोठे संकट डोळ्यासमोर उभारेल. अशी भिती व्यक्त करत त्यांनी महात्मा फुले कर्जमाफी योजनेत असणारी विसंगता दूर करण्याची मागणी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.