महाविकास आघाडी दलालांना पोसणारे सरकार - आ. अभिमन्यू पवार.

1 min read

महाविकास आघाडी दलालांना पोसणारे सरकार - आ. अभिमन्यू पवार.

आ. अभिमन्यू पवार यांनी केली कृषी विधेयकाच्या स्थगिती आदेशाची होळी... 

औसा - केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी ऐतिहासिक कृषी विधेयक मंजूर केले आहे.केंद्र सरकारने पारीत केलेल्या या कृषी विधेयकास राज्य सरकारची स्थगिती विरोधात औसा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दि.७ आॅक्टोबर रोजी आमदार अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडी सरकारने या विधेयकास काढलेल्या स्थगिती आदेशाची होळी करुन राज्य सरकार विरोधात निषेध व आंदोलन करण्यात आले.
यावेळी आ. अभिमन्यू पवार यांनी राज्य सरकारवर विरोधात हल्लाबोल चढवून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार हे शेतकरी विरोधी असून दलालांना पोसणारे आहे. शेती मालाची किंमत ठरवण्याचे अधिकार शेतकऱ्यांना असून तो अधिकार कृषी विधेयकातून शेतकऱ्यांना मिळणार आहे.कृषी उत्पन्न बाजार समित्या शेतकऱ्यांच्या आहेत तर शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार का ? नाही असा सवाल उपस्थित करून आ. पवार यांनी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी झोन बंदी उठवून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय दिला.आशाच प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी हितासाठी कृषी विधेयक मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी सुशीलदादा बाजपाई, अॅड अरविंद कुलकर्णी, ॲड. मुक्तेश्वर वाघधरे,भिमाशंकर मिटकरी, प्रा. भिमाशंकर राचट्टे, संतोषअप्पा मुक्ता,विनोद जाधव, भाजपचे शहराध्यक्ष लहू कांबळे, संजय माळी,युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष धनराज परसणे, नगरसेवक समीर डेंग, गोपाळ धानूरे, दत्ता चेवले, पप्पूभाई शेख, धनराज काजळे,मोहिनी पाठक, माधुुरी पाटील, फहिम शेख,लिंबराज थोरमोटे, भाजप विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण मिटकरी, शहराध्यक्ष रमन वर्मा, अच्युत पाटील, गंगाधर इसापुरे, जगदिश चव्हाण, सिध्दन भेटेकर आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
आ. अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वाखाली औसा विधानसभा मतदारसंघात कासार शिरसी येथे पंचायत समिती सदस्य दिपक चाबुकस्वार व मंडळ अध्यक्ष ज्ञानेश्वरजी वाकडे यांच्या नेतृत्वात तर किल्लारी येथे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष काकासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले.यावेळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते..