महाविकास आघाडी सरकार अस्थिर

1 min read

महाविकास आघाडी सरकार अस्थिर

मुंबई: मागील काही दिवसांपासून महविकास आघाडी सरकार अस्थिर असल्याचे बोलले जात होते. आता त्याला अधिकृत दुजोरा मिळाला आहे. मुंबई मध्ये काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली तेव्हा काँग्रेस चे काही नेते नाराज असल्याचे स्पष्ट झाले. काँग्रेसला सरकारच्या निर्णय प्रकियेमध्ये कोणतेही स्थान नसल्याने आपण महाविकास आघाडी मध्ये नुसत नावालाच आहे का? काँग्रेस बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा काँग्रेसला सरकारच्या निर्णय प्रकियामध्ये स्थान नाही. आम्हाला निर्णय प्रकियात स्थान मिळावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बोलू अशी खदखद त्यांनी व्यक्त केली.
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर उपमुख्यमंत्री पद, विधान परिषदेत एक जागा कमी मिळाल्यामुळे आणि आता सरकारच्या निर्णय प्रकियेत स्थान मिळत नसल्यामुळे काँग्रेस नेते नाराज झाले आहेत. याआधीही निर्णय प्रक्रियेत स्थान मिळत नसल्याची तक्रार बाळासाहेब थोरात यांनी मुख्यंत्र्यांकडे केली होती. राज्य सरकारमध्ये काँग्रेसची एक तृतीयांश भागीदारी असून विधानसभा अध्यक्ष पदासह महसूल, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम ही खाती काँग्रेस कडे आहेत. तर गृह, आरोग्य ही महत्वाची खाती राष्ट्रवादी कडे आहेत. कोरोना वरील उपाययोजनांमध्ये काँग्रेस नेत्यांना आणि मंत्र्यांना स्थान नसल्याने सर्वत्र नाराजीच चित्र आहे.
हे सरकार किती दिवस चालेल हा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. यापूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी महाराष्ट्र सरकार वर नाराज असल्याचे दिसून आले. आम्ही महाराष्ट्र सरकारमध्ये आहोत पण आम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार नाही. पण सरकार स्थिर असल्याचे ते म्हणाले होते. आता सत्तेतील नेत्यांमधील नारीजीचे सुर असल्यामुळे हे सरकार किती दिवस टिकेल. असे प्रश्न उपस्थित होत आहेत.