महाविकास आघाडीला राज्यभर आंदोलनाचा इशारा - खा. संभाजीराजे भोसले

६ जून पर्यंत ठोस निर्णय न घेतल्यास राज्यभर आंदोलनाचा इशारा

महाविकास आघाडीला राज्यभर आंदोलनाचा इशारा - खा. संभाजीराजे भोसले

आशय येडगे/औरंगाबाद: खासदार संभाजीराजे यांनी महाविकास आघाडीला मराठा आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घेण्यासाठी ६ जून पर्यंतची मुदतवजा इशारा दिला आहे. ५ मे २०२१ ला सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर संभाजीराजेंनी राज्यातील मराठा समाजाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शांत राहण्याचे आवाहन केले होते. यादरम्यान त्यांनी राज्यभराचा दौरा करून वेगवेगळ्या जिल्ह्यातील मराठा नेत्यांच्या, मराठा मोर्चाच्या समन्वयकांच्या तसेच वेगवेगळ्या कायदेतज्ञांच्या भेटी घेतल्या.
याच पार्श्वभूमीवर २७ आणि २८ मे रोजी संभाजीराजेंनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटी घेऊन मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा केली त्याचबरोबर या बैठकामध्ये संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणा संदर्भात महाविकास आघाडी सरकारला तीन प्रमुख गोष्टी सुचविल्या.

संभाजीराजे यांनी सुचविलेल्या ३ गोष्टी :
१) महाविकास आघाडी सरकारने संपूर्ण विचार करून सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करावी.
२) पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टामध्ये टिकली नाही तर क्युरेटीव पेटीशन दाखल करावी किंबहुना तशी तयारी सरकारने करावी.
३) वरील दोन्ही पर्यायांचा उपयोग न झाल्यास कलम ३४२-अ अंतर्गत राज्य सरकारने राज्यपालांकडे या कायद्याची शिफारस करावी जेणेकरून मग राज्यपाल राष्ट्रपतींकडे ही मागणी दाखल करू शकतील आणि मग संसदेतून मराठा आरक्षण दिले जाऊ शकेल.

राज्यातील विविध नेत्यांसोबत आणि मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या बैठकांच्या पार्श्वभूमीवर २८ तारखेला पत्रकार परिषद घेऊन संभाजीराजेंनी सरकारला 6 जून पर्यंतची मुदत दिली आहे. ६ जूनपर्यंत महाविकास आघाडी सरकारने प्रतिसाद न दिल्यास मराठा समाज कोरोनाची कसलीही पर्वा न करता राज्यभरात रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा संभाजीराजेंनी दिला आहे.

याचबरोबर संभाजीराजे यांनी मराठा समाजाच्या पाच प्रमुख मागण्या सरकारकडे केल्या आहेत.
त्या खालीलप्रमाणे:
१)
ज्या उमेदवारांच्या नियुक्त्या ९ सप्टेंबर २०२० च्या आधी झालेल्या आहेत अशा उमेदवारांना रुजू करुण घ्या.
२) मराठा आणि इतर समाजांसाठी तयार करण्यात आलेल्या सारथी संस्थेला स्वायत्तता देण्यात यावी आणि तसे केल्यास आरक्षणापेक्षाही जास्त फायदा मराठा समाजाला होऊ शकेल. म्हणजे राज्य सरकारने सारथी साथी १००० कोटी रुपयांची तरतूद करावी अशी मागणी संभाजीराजे यांनी केली आहे.
३) अण्णासाहेब विकास महामंडळाला दिलेली १० लाखांची मर्यादा वाढवून ती २५ लाखांची करण्यात यावी.
४) मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृहं उभे करावे.
५) ७० टक्के मराठा समाज गरीब असतानासुद्धा मराठा समाजाला कसल्याही सवलती दिलेल्या नाहीत तर शिक्षणातील सवलती मराठा विद्यार्थ्यांना लागू कराव्यात ही मागणीसुद्धा यामध्ये केली गेली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.