प्रत्येक कुटुंबाचे होणार सर्वेक्षण

1 min read

प्रत्येक कुटुंबाचे होणार सर्वेक्षण

प्रशासनाच्या वतीने 595 पथकांची नियुक्ती

हिंगोली: राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व कुटुंबांची वैद्यकीय तपासणी व सर्वेक्षण करण्यात येणार असूनय याकरीता 595 पथकांची नियुक्ती केल्याची माहिती जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोविड विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे, राज्य शासनाच्या वतीने माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व व कुटुंबांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीमध्ये आढळून येणार्‍या संशयित रुग्णांना तात्काळ तपासणीकरिता दाखल करण्यात येणार असून बाधित रुग्णांवर उपचार देखील केले जाणार आहेत.
जिल्ह्यामध्ये 13 लाख 35 हजार लोकसंख्या असून एकूण 2 लाख हजार 123 कुटुंब आहेत. या कुटुंबाच्या सर्वेक्षणाकरिता 595 पथके नेमण्यात आले असून. यामध्ये 1785 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. दर पाच पथका मागे एका वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. संशयित रुग्णांना हलविण्याकरीता 29 रुग्णवाहिका तयार करण्यात आल्या आहेत. प्रत्येक पथकामार्फत दररोज किमान पन्नास कुटुंबांची तपासणी करण्यात येईल. या तपासणीमध्ये पाच वर्षापेक्षा कमी व साठ वर्षांपेक्षा अधिक असणाऱ्या नागरिकांची देखील माहिती संकलित केली जाणार आहे.
ruchesh-hingoli
सदर माहिती राज्य शासनाच्या वतीने निर्माण करण्यात आलेल्या ॲप वर संकलित केली जाणार आहे. येत्या पंधरा दिवसात ही मोहीम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रत्येक पथकासोबत स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधींचे दोन सदस्य सामील केले जाणार आहेत. यामध्ये एका महिलेचा देखील समावेश करून घेण्यात येणार आहे. याकरिता जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी सहकार्य करण्याचे आवाहन देखील रुचेश जयवंशी यांनी केले आहे. जिल्ह्यामध्ये विविध सेंटर करीता पुरेसा ऑक्सिजन साठा उपलब्ध असल्याची माहिती देखील यावेळी जयवंशी यांनी दिली.
या पत्रकार परिषदेला जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधा विनोद शर्मा, जिल्हा आरोग्य अधिकारी शिवाजी पवार, जिल्हा शल्य चिकित्सक किशोर श्रीवास, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.