लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी जास्तीत जास्त लोकांना काँग्रेसचे सदस्य करून घ्या: एच. के. पाटील

देशभर १ नोव्हेंबरपासून काँग्रेस सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात

लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी जास्तीत जास्त लोकांना काँग्रेसचे सदस्य करून घ्या: एच. के. पाटील

मुंबई : काँग्रेस पक्षाची स्थापना मुंबईत शहरात झाली. मुंबई व महाराष्ट्राने काँग्रेस पक्ष, इंदिराजी, राजीवजी यांना ताकद दिली आहे. आजपासून सुरु झालेल्या काँग्रेस सदस्य नोंदणीतही जास्तीत जास्त सदस्य नोंदवून मुंबई आणि महाराष्ट्राने संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणाच्या मोहिमेत मोठ्या संख्येने नागरिकांना सहभागी करून घ्यावे असे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय टिळक भवन दादर येथे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या हस्ते आज काँग्रेस सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना पाटील पुढे म्हणाले की, मुंबईच्या ऐतिहासिक आणि पवित्र महानगरात काँग्रेस पक्षाची स्थापना करण्यात आली. मुंबई काँग्रेस विचारांचं शहर आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निर्देशानुसार देशभर १ नोव्हेंबरपासून काँग्रेस सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात झाली आहे. मुंबई काँग्रेस १० लाख सदस्यांची नोंदणी करणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी करावी. आपले नेते राहुल गांधी २८ डिसेंबर रोजी शिवाजी पार्क येथे आयोजित मेळाव्याला संबोधित करणार आहेत त्यावेळी काँग्रेस पक्षाच्या सदस्य नोंदणीचा आढावा त्यांच्यासमोर मांडा.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.