शेतकऱ्यांना खते व बियाणे सुलभतेने मिळवून द्या-आ.निलंगेकर

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत...

शेतकऱ्यांना खते व बियाणे सुलभतेने मिळवून द्या-आ.निलंगेकर

निलंगा : या खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते व बियाणे मिळवण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे तसेच अनेक कृषी केंद्र चालक कृत्रिम खते व बियाणे टंचाई करून शेतकऱ्यांना अडचणीत आणत आहेत यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे.अशा काळात शेतकरी खरीप पेरणी संदर्भात अडचण निर्माण न करता स्वता कृषी अधिकारी व कर्मचारी यानी लक्ष घालून खते व बियाणे वेळेत व सुलभतेने वितरण करण्यास मदत करावी अन्यथा गय केली जाणार नाही.तसेच खासगी बियाण्यांचा वापर टाळून शेतकऱ्यांनी घरगुती बियाणे वापरावर जोर द्यावा तसेच ग्रामसेवक, तलाठी, कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक व संबंधित अधिकाऱ्यांनी गाव पातळीवर व तालुका पातळीवर याबाबत बैठक घेऊन व यासंदर्भात जनजागृती करावी व शेतकऱ्यांना सुलभतेने खते व बियाणे मिळवून द्या अशा सुचना केल्या.शेतकऱ्यांना बियाणे खरेदीत अडचण झाली तर या चूका खपवून घेतल्या जाणार नाहीत असे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले.

जिल्ह्यात शेतकऱ्यांना लागणारी एकूण बियाणे आणि मिळालेली बियाणे याबद्दल माहिती काढणे, जिल्ह्यातील बियाणे विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांसोबत चर्चा करून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविणे, त्यांना योग्य ती मदत करण्याकडे लक्ष देणे याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आढावा बैठक घेऊन सूचना दिल्या.यात हलगर्जी कराल तर गय केली जाणार नाही अशी तंबीही निलंगेकर यानी दिली.

राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे व उदाशीनतेमुळे शेतकऱ्यांना खते व बियाणे खरेदीत अडचण निर्माण होत आहे.अधिकार व कृषी केंद्र चालक यावर सरकारचे नियंत्रण नाही तसेच शेतकऱ्यांच्या समस्याकडे बघायला या सरकारमधील पालकमंञी याना वेळ नाही.शेतकरी संदर्भात या जिल्ह्याचे पालकमंञी एक शब्दही बोलत नाहीत म्हणजे नेमके शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक अडचणीत आणत आहेत.सत्तेत बसलेल्या लोकांना शेतकऱ्यांचे काही देणेघेणे नाही अशी टीकाही आ.संभाजी पाटील निलंगेकर यानी केली.

यावेळी उपविभागीय अधिकारी विकास माने जिल्हा कृषी अधिकारी गवसाने निलंगा तालुका कृषी अधिकारी काळे शिरूर अनंतपाळ तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे देवणी पंचायत समिती कृषी अधिकारी देवाशे लातूर जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी चोले जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ.भारतबाई सोळुंके, माजी समाज कल्याण सभापती संजय दोरवे या आढावा बैठकीला उपस्थिती होती.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.