मालिका, सिनेमा आणि कॉमेडी शो यांचे चित्रीकरण पुन्हा सुरु

1 min read

मालिका, सिनेमा आणि कॉमेडी शो यांचे चित्रीकरण पुन्हा सुरु

मागील तीन महिन्यांपासून मालिका, सिनेमा आणि कॉमेडी शो यांची शूटींग बंद होती. आता शूटींग पुन्हा सुरु केली असून दर्शकांना जुलै मध्ये मालिकांचे नविन भाग पाहता येतील.

मुंबईः लॉकडाऊन झाल्यानंतर सर्व छोट्या पडद्यावरील विविध मालिकांची शूटींग बंद होती. आता अनलॉक मध्ये शूटींग सुरु करण्यात येणार आहे. यामुळे दर्शकांना आपल्या आवडत्या मालिका जुलै मध्ये पाहता येणार आहे. या मालिकांच्या माध्यमातुन दर्शकांची मनोरंजन केले जाते. राज्यतील शंभरहुन आधिक मालिका, कॉमेडी शो आणि सिनेमा यांच्या शूटींगसाठी सरकारने परवानगी दिली आहे. सर्व टीव्ही चॅनेलचे सीईओ व आम्ही सर्व निर्मात्यांनी एकत्रितपणे बैठक घेऊन मालितांचे शूटींग हळूहळू सुरु केले आहे. 13 जुलै पासून मालिकांचे नवे भाग छोट्या पडद्यावर येतील. असे नितीम वैद्या, टीव्ही मालिकांचे निर्माते यांनी सांगितले.

अनलॉकडाऊन मध्ये प्रत्येक क्षेत्र हळूहळू खुले होत असून सिनेमासुद्धी देखील सुरु होत आहे. सुरक्षितेच्या कारणास्तव तब्बल अडीच लाख कर्मचाऱ्यांचा कोरोना विमा उतरवून मनोरंजन क्षेत्रानेही आपल्या कामाला सुरुवात केली आहे. लाईट....कॅमेरा....अँक्शन ... म्हणत नियमांचे पालन करत आजपासून टीव्ही मालिकांचे शूटींग सुरु होत आहे. कोरोनाच्या पार्श्र्वभूमिवर शूटींग सुरु करण्याबाबत जी आर निघाल्यानंतर आरोग्य विभागाने सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या, त्यानुसार काही मालिकांची शूटींग सुरु झाली आहे. शूटींग दरम्यान कोणालाही कोरोनाचा संसर्ग झाल्यास उपचारासाठी 2 लाख तर दुदैवाने मृत्यू झाल्यास 25 लाखांच्या विम्याचे कवच टीव्ही मालिकांच्या निर्मादत्यांच्या पुढाकारातून कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आले आहे.

असे नियम असतील

  • कॅमेरा व कपडेपटापासून सर्व साहित्यांना सॅनिटायझेशन करावे लागेल.
  • राहण्याच्या ठिकाणापासून शूटींगच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना आणण्यासाठीची वाहने सॅनिटेशन करावी लागेल.
  • सर्व कर्मचारी मास्कचा वापर तसेच मेकअपमन पीपीई किटचा वापर करतील.