गळफास घेऊन इसमाची आत्महत्या

घटनेचा अधिक तपास मोंढा पोलिस ठाण्याचे कर्मचारी नागरगोजे करीत आहेत...

गळफास घेऊन इसमाची आत्महत्या

परभणी : येथील एका ३५ वर्षीय इसमाने राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरातील रघुनाथदास सोसायटीमध्ये आज सकाळच्या सुमारास घडली.

संजय बाबुराव सपाटे (वय ३५) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी नवामोंढा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शहरातील मोंढा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय सपाटे यांनी शुक्रवारी रात्री ११ ते शनिवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान घरातील पत्राच्या अँगलला पांढर्‍या मोठ्या रुमालाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली. सकाळी अकरा वाजेपर्यंत संजय का उठला नाही, हे पाहण्यासाठी व त्याला झोपेतून उठवण्यासाठी त्याची आई गेली असता त्याने गळफास घेतल्याचे तिच्या निदर्शनास आले. त्यानंतर घटनेची माहिती नवामोंढा पोलिसांना देण्यात आली. फौजदार सुनील पल्लेवाड हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, संजय सपाटे यांच्या पश्चात आई, भाऊ असा परिवार आहे. संजय हे केबलसह लाईट फिटींगचे काम करत असल्याचे स्थानिक रहिवासी सांगतात. घटनेचा अधिक तपास मोंढा पोलिस ठाण्याचे कर्मचारी नागरगोजे करीत आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.